उमेदवारांची व्यूहरचना; प्रभागनिहाय जबाबदारी

By Admin | Updated: February 22, 2017 01:30 IST2017-02-22T01:29:37+5:302017-02-22T01:30:10+5:30

वाहनांची सोय : सकाळच्या सत्रात मतदानासाठी केला आग्रह

Configuration of candidates; Division wise responsibility | उमेदवारांची व्यूहरचना; प्रभागनिहाय जबाबदारी

उमेदवारांची व्यूहरचना; प्रभागनिहाय जबाबदारी

नाशिक : महापालिका निवडणुकीत विजयी पताका झळकविण्यासाठी पश्चिम विभागातील ७, १२ व २४ या प्रभागांमधील सर्व पक्षीय उमेदवारांनी विशेष व्यूहरचना करण्यात आल्याचे दिसून आले. सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाल्यापासून विविध पक्षांच्या उमेदवारांनी परिचित व जवळच्या मतदारांना सकाळच्या सत्रात मतदान आटोपून घेण्याचा आग्रह केला.
पश्चिम विभागातील तिन्ही प्रभागांतील मतदान केंद्रांबाहेर उमेदवारांनी स्वत: उभे राहून मतदान क रवून घेतले. अपक्ष उमेदवार मात्र काही प्रमाणात कमी पडल्याचे दिसून आले. त्यांची यंत्रणा अपुरी पडल्याचे दिसून येत असताना पक्षीय उमेदवारांनी मात्र परिसरातील मतदारांना आग्रह करून सकाळच्या सत्रातच मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ७ मधील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, रुंग्ठा हायस्कूल, पोलीस मुख्यालय परिसरातील मनपा शाळा क्रमांक १६, मविप्रच्या मराठा हायस्कूलची जुनी व नवी इमारत, महर्षी शिंदे अध्यापक महाविद्यालय, अभिनव बालविकासमंदिर, व्ही. एन. नाईक महाविद्यालय, केबीएच हायस्कूल, किलबिल सेंट जोसेफ हायस्कू ल, वाघ गुरुजी शाळा, केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय, सीएमसीएस महाविद्यालय, उदोजी मराठा बोर्डिंग परिसरातील महाविद्यालय, होरायझन अकॅ डमी, निर्मला क ॉन्व्हेंट हायस्कूल परिसरातील मतदान केंद्रास प्रभाग १२ मधील मध्यवर्ती हिंदू शिक्षण मंडळाच्या परिसरात, महात्मानगर क्रिकेट असोसिएशन परिसर, गोखले एज्युकेशन सोसायटी, बॉइज टाउन हायस्कूल, त्र्यंबकरोड परिसरातील फ्रावशी अकॅडमी, उंटवाडी परिसरातील कृषी विकास व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, शरणपूररोड परिसरात सिल्वर ओक स्कूल, रचना विद्यालय राका कॉलनीतील लोकहितवादी मंडळ सभागृह परिसरात जलतरण तलावाजवळील विभागीय अभियंता याचे कार्यालय, संत फ्रान्सीस हायस्कूल, राजे शिवाजी मार्गदर्शन केंद्र, गायकवाडनगर मनपा प्राथमिक शाळा क्रमांक ६६, रमाबाई आंबेडकर हायस्कूल आदि परिसरांत उमेदवारांनी प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधत मतदानासाठी आमंत्रित केले. तसेच मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहनांची व्यवस्थाही केली.

Web Title: Configuration of candidates; Division wise responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.