सर्वधर्मसमभाव रॅलीचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:28 IST2020-01-27T22:46:21+5:302020-01-28T00:28:30+5:30
आॅल इंडिया एससी-एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सर्वधर्मसमभाव रॅॅली काढण्यात आली.

मनमाड येथे रॅलीचे उद््घाटन करताना माजी नगराध्यथ राजाभाऊ पगारे. समवेत सतीश केदारे, अहमद बेग आदी.
मनमाड : आॅल इंडिया एससी-एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सर्वधर्मसमभाव रॅॅली काढण्यात आली.
रॅलीचे उद््घाटन माजी नगराध्यक्ष राजाभाउ पगारे यांचा हस्ते मशाल पेटवून करण्यात आले. यावेळी फुले, शाहू, आंबेडकर मुस्लीम विचार मंचचे अध्यक्ष अहमद बेग, प्रवीण बागुल, प्रकाश बोडके, रमाकांत मत्री, नितीन पवार, राजाभाऊ सपकाळे, प्रवीण पगारे, संघटनेचे सचिव सतीश केदार, प्रदीप गायकवाड, इरफान शेख आदी उपस्थित होते.
या रॅलीमधे विविध धर्माचे धर्मगुरू सहभागी झाले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावरुन रॅलीची सुरुवात झाली. शहराच्या प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या रॅलीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. यावेळी माजी आमदार जगन्नाथ धात्रक, उपनगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे, नगरसेवक गंगादादा त्रिभुवन, गणेश धात्रक, फिरोज शेख आदी उपस्थित होते. भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. राष्टÑगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.