रोहित्राच्या खांबाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 21:27 IST2020-07-05T21:26:28+5:302020-07-05T21:27:56+5:30
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावठा येथे वीजपुरवठा करणार्या रोहित्राच्या विद्युत खांबांची दयनीय दुरवस्था झाली आहे. हे ठिकाण अपघात प्रवण बनले आहे. यामुळे संबंधित विभागाने तत्काळ दखल घेत त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गावठा येथील रोहित्राच्या खांबांची झालेली दुरवस्था.
लोकमत न्यूज नेटवर्क
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावठा येथे वीजपुरवठा करणार्या रोहित्राच्या विद्युत खांबांची दयनीय दुरवस्था झाली आहे. हे ठिकाण अपघात प्रवण बनले आहे. यामुळे संबंधित विभागाने तत्काळ दखल घेत त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावठा येथे असलेल्या रोहित्राजवळच काही घरे व शेतीही आहे. या भागात अबालवृद्धांचा वावर असतो. गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या विद्युत खांबांची दयनीय अवस्था झाली आहे. या खांबांना छिद्र पडले आहे. या रोहित्राला वीजवाहक तारांमुळे आधार आहे. मात्र तारा बाजुला झाल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जोरदार वाºयाच्या झोतात पडून जाण्याचीही भीती ग्रामस्थांना वाटत आहे. याबाबत संबंधित विभागाकडे ग्रामस्थांनी अनेकदा तक्रार करुनही त्याकडे संबंधित अधिकारी व कर्मचार्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.गावाला वीजपुरवठा होत असलेल्या रोहित्राच्या खांबांची दुरवस्था झाली असून अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने तत्काळ दुरुस्ती करायला हवी. मात्र, अनेकदा तक्रार करुनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
- जगन लहारे, ग्रामस्थ गावठा या रोहित्राच्या दयनीय अवस्थेतबाबत संबंधित विभागाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण? तसेच खांब फक्त वीजतारांच्या भरवश्यावर आहेत. ते कधीही कोसळू शकतात.त्यामुळे तत्काळ दुरुस्ती करावी.
- दिनेश लहारे,
सामिजक कार्यकर्ते, गावठा