रुग्णालयात बाधितांचे हाल; बाहेर नातेवाईक बेहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:13 IST2021-04-15T04:13:57+5:302021-04-15T04:13:57+5:30

मालेगाव येथील सामान्य रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी १०० बेडची व्यवस्था आहे. या ठिकाणाहून बरे होणाऱ्यांच्या प्रमाणाइतकेच नव्याने दाखल होणाऱ्यांचे ...

The condition of the injured in the hospital; Outside relatives unwell | रुग्णालयात बाधितांचे हाल; बाहेर नातेवाईक बेहाल

रुग्णालयात बाधितांचे हाल; बाहेर नातेवाईक बेहाल

मालेगाव येथील सामान्य रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी १०० बेडची व्यवस्था आहे. या ठिकाणाहून बरे होणाऱ्यांच्या प्रमाणाइतकेच नव्याने दाखल होणाऱ्यांचे प्रमाण आहे. त्यामुळे दाखल होणाऱ्या रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना २४ तास या ठिकाणी काढावे लागतात. शौचालयाची तसेच निवासाची व्यवस्था नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे.

कोट...

मालेगावी सामान्य रुग्णालयात माझ्या घरातील सदस्य कोरोनाच्या उपचारासाठी दाखल आहे. येथे शौचालय आणि बाथरूमची अवस्था अत्यंत वाईट आहे. शौचालय आणि बाथरूम पाहूनच पेशंट आजारी पडतो. चार ते पाच दिवसांपासून त्यांची स्वच्छता करण्यात आलेली नाही. रुग्णाबरोबर असल्याची शिक्षा नातेवाईकांना भोगावी लागते.

- गणेश भदाणे, वजीरखेडे

सामान्य रुग्णालयाकडे येणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. येथे शौचालयाची नीट व्यवस्था नाही तसेच रुग्णांना जेवण व्यवस्थित दिले जात नाही. सोबत येणाऱ्या नातलगांच्या राहण्याची व्यवस्था चांगली नसल्यामुळे व्हरांड्यात मिळेल त्या जागी पडून राहावे लागते किंबहुना रुग्णाबरोबर आपणही बाधित तर होणार नाही ना, अशी भीती वाटते.

- राजेंद्र पाटकर, वजीरखेडे

रुग्ण दाखल असल्याने नातेवाईक म्हणून आपल्याला येथे थांबावेच लागते. दिवस कळत नाही. परंतु रात्री डास, मच्छरांच्या त्रासाने झोप येत नाही. नातलगांच्या राहण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात यावी. नातेवाईकांची काळजी घेतली जात नसल्याने रुग्णांबरोबर तेदेखील आजारी पडत आहेत.

- यशोदीप अहिरे, लखमापूर

इन्फो...

नातेवाईकांकडे जाता येत नाही अन् दुकानात काही मिळत नाही

घरातील पेशंट पॉझिटिव्ह असल्याने मदतीसाठी कोणत्याही नातेवाईकांकडे जाता येत नाही. बाधिताच्या संपर्कात असल्याने नातेवाईकांचीही पाहण्याची नजर बदललेली असते. जवळपासच्या दुकानात आवश्यक वस्तू मिळत नसल्यानेही गैरसोय होते.

===Photopath===

140421\14nsk_63_14042021_13.jpg

===Caption===

मालेगाव येथील सामान्य रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये नातेवाईक.

Web Title: The condition of the injured in the hospital; Outside relatives unwell