सिडकोतील दुभाजकांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:22 IST2021-05-05T04:22:56+5:302021-05-05T04:22:56+5:30

रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचा उपद्रव नाशिक : जुने नाशिक, भद्रकाली परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. कुत्र्यांच्या झुंडी सकाळी आणि ...

The condition of the dividers in CIDCO | सिडकोतील दुभाजकांची दुरवस्था

सिडकोतील दुभाजकांची दुरवस्था

रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचा उपद्रव

नाशिक : जुने नाशिक, भद्रकाली परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. कुत्र्यांच्या झुंडी सकाळी आणि रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून फिरत असल्याने नागरिकांनाही त्यांची भीती वाटत आहे. रस्त्यावर टाकलेले शिळे अन्न, दुकानांतून फेकले जाणारे पदार्थ यामुळे कुत्र्यांचा संचार वाढल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

उद्यानांमध्ये वाढले गवत

नाशिक : शहरातील बंद उद्यानांमध्ये गवत वाढल्यामुळे डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे उद्यानांमधील गवत काढून उद्याने पुन्हा सुशोभित करावीत, तसेच परिसरात धूरफवारणी करून डासांचा उपद्रव कमी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मोकाट जनावरांचा रस्त्यावर ठिय्या

नाशिक : शहरातील सातपूर भागांत सध्या मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याने फिरणाऱ्या या जनावरांमुळे वाहतुकीला आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गुरांच्या झुंडी रस्त्यावर ठाण मांडून बसतात. त्यामुळे कधी तर नागरिकांचे अपघात देखील होतात.

थुंकणाऱ्यांवर व्हावी कठोर कारवाई

नाशिक : अद्यापही कोरोनाचे थैमान सुरूच असल्यामुळे रस्त्यावर थुंकणाऱ्यांमुळे संसर्ग पसरण्याची भीती असल्याने अशा व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज आहे. सध्या मास्क न लावल्यास कारवाई होते. मात्र, मास्क बाजूला सारून रस्त्यावर पचापच थुंकणाऱ्या नागरिकांना दंड झाल्याचे दिसत नाही. या प्रकाराला आळा घालण्यासाठी रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.

Web Title: The condition of the dividers in CIDCO