सटाणा येथे मका पिक कार्यशाळा संपन्न
By Admin | Updated: July 24, 2014 00:59 IST2014-07-23T22:40:41+5:302014-07-24T00:59:12+5:30
सटाणा येथे मका पिक कार्यशाळा संपन्न

सटाणा येथे मका पिक कार्यशाळा संपन्न
सटाणा : मका, चारा आणि धान्याची मागणी वाढत असून, येणाऱ्या काळात पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांना जाणवणारी चाऱ्याची कमतरता लक्षात घेऊन कावेरी सीड्सच्या २५ के ६० या मका बियाणाच्या वाणाची लागवड फायदेशीर होईल, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी डी. के. कापडणीस यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शासकीय व खासगी क्षेत्राच्या साहाय्याने मका मूल्य साखळी विकास प्रकल्प सुरू असून, त्या अंतर्गत सटाणा तालुक्यातील पठावे दिगर येथे आयोजित मका पिकाच्या कार्यशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कापडणीस बोलत
होते. याप्रसंगी मंडल कृषी अधिकारी डी.एस. पाटील, कृषी सहाय्यक योगेश बोरसे, मधुकर ठाकरे व शेतकरी उपस्थित होते. कावेरी सीड्स कंपनीचे प्रकल्प समन्वयक सचिन पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मका उत्पादन वाढीच्या तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले. कंपनीचे तालुका प्रतिनिधी देवेंद्र बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. कृषी सहाय्यक योगेश बोरसे यांनी आभार मानले. (वार्ताहर)