वणी : संस्वेखर महातीर्थावर ऐश्वर्याबेन यांचा दीक्षांत सोहळा आज सकाळी पार पडला. आचार्य भगवानांच्या उपस्थितीत विनम्र प्रियाश्री असे नामकरण करण्यात आले. पहाटेपासून दीक्षा विधीस प्रारंभ झाला. या विधीत केशलोचन, साध्वी वेषभूषा त्यात ओगो, कांबळी, पात्र, कपडे प्रदान करण्यात आले. उर्वरित दोन दीक्षार्थींची दीक्षा ११ फेबु्रवारी रोजी आयोजित करण्यात आला असून, १४ रोजी वरघोडा व १७५ तपस्वींच्या उपध्यानाची सांगता होणार आहे. तसेच १५ रोजी नियोजित महोत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती देण्यात आली. (वार्ताहर)
ऐश्वर्याबेन यांचा दीक्षांत सोहळा संपन्न
By admin | Updated: February 9, 2015 01:41 IST