नांदूरवैद्यच्या विकासकामांबाबत ग्रामस्थांचे खासदारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST2021-09-02T04:29:35+5:302021-09-02T04:29:35+5:30

इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे भैरवनाथ महाराज मंदिरापासून ते मारूती मंदिरापर्यंत असलेला मुख्य रस्ता, तसेच स्मशानभूमी निवारा शेड आदींसह विविध ...

Concern the MPs of the villagers regarding the development work of Nandurvaidya | नांदूरवैद्यच्या विकासकामांबाबत ग्रामस्थांचे खासदारांना साकडे

नांदूरवैद्यच्या विकासकामांबाबत ग्रामस्थांचे खासदारांना साकडे

इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे भैरवनाथ महाराज मंदिरापासून ते मारूती मंदिरापर्यंत असलेला मुख्य रस्ता, तसेच स्मशानभूमी निवारा शेड आदींसह विविध प्रलंबित विकासकामांबाबत खासदार गोडसे यांची भेट घेत माजी सरपंच दिलीप मुसळे यांच्यासह ग्रामस्थांनी चर्चा केली. यावेळी गोडसे यांनी प्रलंबित असलेली कामे लवकर पूर्ण करू, असे आश्वासन दिले. नांदूरवैद्य येथे अनेक वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित होता. परंतु स्मशानभूमीत सुसज्ज शेडचे बांधकाम पूर्ण झाले असून, या स्मशानभूमीजवळ एक निवारा शेड असावी, अशी ग्रामस्थांची मागणी असल्यामुळे सरपंच उषा रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. या ठरावाची प्रत गोडसे यांना देण्यात आली.

याप्रसंगी रोहिदास सायखेडे, राजू मुसळे, रवी काजळे, माजी उपसरपंच नितीन काजळे, कुंडलिक मुसळे, राजू रोकडे, आनंदा कर्पे, बाबू रोकडे, प्रभाकर मुसळे, मारूती दिवटे, लक्ष्मण पूंजा मुसळे, योगेश यंदे, मारूती डोळस, माधव कर्पे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

छायाचित्र- ३१ नांदूरवैद्य१

नांदूरवैद्य येथील प्रलंबित विकासकामांबाबत खासदार हेमंत गोडसे यांना निवेदन देताना दिलीप मुसळे. समवेत रोहिदास सायखेडे, कुंडलिक मुसळे, नितीन काजळे, राजू मुसळे व ग्रामस्थ.

310821\31nsk_7_31082021_13.jpg

नांदूरवैद्य येथील प्रलंबित विकासकामांबाबत खासदार हेमंत गोडसे यांना निवेदन देतांना दिलीप मुसळे. समवेत रोहिदास सायखेडे, कुंडलिक मुसळे, नितीन काजळे, राजू मुसळे व  ग्रामस्थ. 

Web Title: Concern the MPs of the villagers regarding the development work of Nandurvaidya