सटाण्यात ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:20 IST2021-09-10T04:20:59+5:302021-09-10T04:20:59+5:30

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका बघता इतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे. हा धोका लक्षात घेता सटाणा ...

The concept of 'Ek Gaon Ek Ganpati' in Satna | सटाण्यात ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना

सटाण्यात ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका बघता इतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे. हा धोका लक्षात घेता सटाणा शहरात एक गाव एक गणपतीची स्थापना करून पुन्हा एकदा आदर्श घडवून द्यावा, इतर सर्व अनावश्यक खर्चाला फाटा देत रक्तदान शिबिर आयोजित करावेत, असे विचार उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत शिंदे यांनी मांडले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे, पोलिस निरीक्षक सुभाष अनमोलवार, नायब तहसीलदार नेरकर, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी विजय देवरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

घरगुती गणपती मूर्तीचे नदीपात्रात विसर्जन न करता विसर्जन कुंड तयार करून त्यात विसर्जन करावे. यामुळे

नदीपात्रात होणारे प्रदूषण टळेल, मंडळांनी एक गाव एक गणपतीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून गणेशोत्सव साजरा करावा, गणपती बाप्पा स्थापनेच्या दिवशी व विसर्जनाच्या दिवशी कोणतेही वाद्य वाजवता येणार नाही अशा सूचना पोलीस निरीक्षक सुभाष अनमोलवार यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केल्यात.

या वेळी शिवसेनेचे लालचंद सोनवणे, माजी नगरसेवक अरविंद सोनवणे, मनसेचे शहराध्यक्ष पंकज सोनवणे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, मंगेश खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी राजकीय पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: The concept of 'Ek Gaon Ek Ganpati' in Satna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.