ई-लर्निंग शाळेसाठी द्वारकाधीश साखर कारखान्याने दिले संगणक

By Admin | Updated: April 18, 2016 00:30 IST2016-04-17T22:45:44+5:302016-04-18T00:30:14+5:30

ई-लर्निंग शाळेसाठी द्वारकाधीश साखर कारखान्याने दिले संगणक

Computer given by Dwarkadhyad sugar factory for e-learning school | ई-लर्निंग शाळेसाठी द्वारकाधीश साखर कारखान्याने दिले संगणक

ई-लर्निंग शाळेसाठी द्वारकाधीश साखर कारखान्याने दिले संगणक

सटाणा : बागलाण तालुक्यातील चौगाव येथील प्राथमिक शाळा ई-लर्निंग करण्यासाठी द्वारकाधीश साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक व जिल्हा बँकेचे संचालक सचिन सावंत यांच्या पुढाकारातून शाळेला संगणक संच भेट देण्यात आला.
तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्यातर्फेभूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी गाळ उपसणे, मातीबांध बांधणे असे विविध उपक्र म राबविले जात असतानाच शेतकऱ्यांच्या पाल्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी कारखान्याने पुढाकार घेतला आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन सावंत यांनी तालुक्यातील चौगाव येथील प्राथमिक शाळा ई-लर्निंग करण्यासाठी रामनवमीचे औचित्य साधून संगणक संच भेट दिला. शाळेचे मुख्याध्यापक डी.जी. खैरनार, व्ही.के. भामरे यांनी संगणक स्वीकारला.
यावेळी हभप भालचंद्र आवारे, बारकू शेवाळे, लक्ष्मण मांडवडे, संजय शेवाळे, नंदिकशोर शेवाळे, हरी मांडवडे, पंडित शेवाळे, दादाजी शेवाळे, आबा दळवी, आनंदा मांडवडे, रामकृष्ण शेवाळे, राजेंद्र मांडवडे, मोठाभाऊ मांडवडे, संदीप मांडवडे आदि उपस्थित होते.(वार्ताहर)
पोलीस भरतीत ४५ परीक्षार्थी गैरहजर
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील शिपाईपदाच्या रिक्त ३१ जागांसाठी शनिवारी (दि़ १६) सकाळी पोलीस कवायत मैदानावर घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेला ५९९ उमेदवारांनी हजेरी लावली, तर ४५ उमेदवारांनी दांडी मारली़ लेखी परीक्षेची उत्तरतालिका ही शनिवारी सायंकाळपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे़ पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली शिपाई पदाच्या ३१ रिक्त जागांसाठी ४ हजार ९१६ उमेदवारांनी आॅनलाइन अर्ज केले होते़ २९ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत झालेल्या मैदानी चाचणीत सुमारे दोन हजार उमेदवार पात्र ठरले. त्यातून गुणांकनानुसार ६४४ उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आली. या उमेदवारांची लेखी परीक्षा मुख्यालयाच्या मैदानावरील सभागृहात झाली (प्रतिनिधी)

Web Title: Computer given by Dwarkadhyad sugar factory for e-learning school