नांदगावला ४८२२ प्रकरणांमध्ये तडजोड विधि सेवा समिती : ७२ लाख ५९ हजार ८९२ रु पये एवढी विक्र मी वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:46 IST2017-12-10T23:08:42+5:302017-12-10T23:46:55+5:30
तालुका विधि सेवा समिती व वकील संघ यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दाखलपूर्व प्रकरणे व प्रलंबित प्रकरणे समजुतीसाठी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते.

नांदगावला ४८२२ प्रकरणांमध्ये तडजोड विधि सेवा समिती : ७२ लाख ५९ हजार ८९२ रु पये एवढी विक्र मी वसुली
नांदगाव : तालुका विधि सेवा समिती व वकील संघ यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दाखलपूर्व प्रकरणे व प्रलंबित प्रकरणे समजुतीसाठी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तडजोडीच्या माध्यमातून न्यायालयीन व विविध संस्थांच्या ४८२२ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन तब्बल ७२ लाख ५९ हजार ८९२ रु पये एवढी विक्र मी वसुली झाली. या वसुलीत सर्वाधिक ग्रामपंचायत कार्यालयाच्या ३८८७ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ५२ लाख ४४ हजार ४९ रुपये वसूल करण्यात आले.
तसेच प्रलंबित प्रकरणांपैकी ४ दिवाणी प्रकरणे व इतर ६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. रविवारी सकाळी राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे करण्यात आले. या प्रसंगी तालुका विधि सेवा समिती अध्यक्ष तथा न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रेरणा दांडेकर म्हणाल्या की, राष्ट्रीय लोकअदालतीमुळे लोकसेवा करण्याची संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाप्रति असलेले आपले कर्तव्य बजावण्याची भावना आपल्या मनात असू द्यावी. या राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून देशसेवेची भावना जागृत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी लोकअदालत ही लोक चळवळ व्हावी, असे मत व्यक्त केले होत. त्या अनुषंगाने राष्ट्रीय लोकअदालतीद्वारे तालुक्यात जनजागृती मोहीम राबविण्यात आली. राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यात सगळ्यांचा सहभाग असावा, असेही त्या शेवटी म्हणाल्या. यावेळी न्यायालय आवारात भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीसह मांडवड, बोलठाण, परधाडी, गंगाधरी, कळमदरी या गावांतील ग्रामपंचायतींच्या वतीने करवसुलीसाठी स्टॉल्स उभारण्यात आले होते. लोकअदालतीमध्ये व्ही. पी. अहेर, योगेश जमदाडे, जे. टी. सूर्यवंशी, सचिन वांगडे आदी उपस्थित होते.