पालिकेच्या कंपोस्ट खताचे दर ‘जैसे थे

By Admin | Updated: May 22, 2016 01:12 IST2016-05-21T22:38:40+5:302016-05-22T01:12:39+5:30

’प्रस्ताव : दुष्काळी स्थितीचा मागणीवर परिणाम

The compost fertilizer rate of the corporation was like ' | पालिकेच्या कंपोस्ट खताचे दर ‘जैसे थे

पालिकेच्या कंपोस्ट खताचे दर ‘जैसे थे

 नाशिक : यंदाची दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन महापालिकेने खतप्रकल्पावर तयार होणाऱ्या कंपोस्ट खताच्या दरामध्ये वाढ न करण्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवला असून त्याला मंजुरी मिळणे निश्चित आहे.
महापालिकेच्या खतप्रकल्पावर कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती केली जाते. सदर कंपोस्ट खत हे गोणीमध्ये प्रति टन ३ हजार रुपये तर सुट्या स्वरूपात २५०० रुपये प्रति टन या दराने विक्री केले जाते. यापूर्वी महापालिकेने खताला मागणी लक्षात घेता त्यात वेळोवेळी दरवाढ केलेली आहे. परंतु मागील वर्षी पाऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांकडून अपेक्षित अशी खताची मागणी आली नाही. सन २०१५-१६ या वर्षात खतप्रकल्पावर १५०० मे. टनपेक्षा जास्त खताचे उत्पादन झाले आहे. मात्र, विक्री केवळ ८०० मे. टन इतकीच झालेली आहे. त्यामुळे मागील वर्षाचे आणि चालू वर्षाचे मिळून सुमारे १५०० मे. टन खताचा साठा शिल्लक आहे. सद्यस्थितीत पाणीटंचाईची भीषण स्थिती निर्माण झाल्याने खताला मागणी रोडावली आहे. शेतकऱ्यांनीही सदर खताचे दर कमी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे यंदा खताच्या दरात वाढ केल्यास विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून महापालिकेने दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा प्रस्ताव महासभेवर मान्यतेसाठी ठेवला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The compost fertilizer rate of the corporation was like '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.