लोकसभा निवडणूक दोन दिवशीय प्रशिक्षण वर्ग पुर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 18:58 IST2019-04-08T18:56:55+5:302019-04-08T18:58:50+5:30
येवला : दिंडोरी अनुसूचित जमाती लोकसभा मतदार संघ अंतर्गत ११९ येवला विधानसभा मतदार संघात २९ एप्रिलच्या रोजी होणाºया लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रि येची तयारी करण्याच्या पार्श्वभूमीवर १६०० कर्मचाऱ्यांचे दोन दिवशीय प्रशिक्षण वर्ग येवल्यात पार पडला.

येवल्यात लोकसभा निवडणूक कामाचे प्रशिक्षण देतांना निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र पाटील, समवेत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिदास वारु ळे, रमेश अन्नदाते, राजेंद्र वारु ळे, प्रकाश बुरु ंगळे व पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणार्थी.
येवला : दिंडोरी अनुसूचित जमाती लोकसभा मतदार संघ अंतर्गत ११९ येवला विधानसभा मतदार संघात २९ एप्रिलच्या रोजी होणाºया लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रि येची तयारी करण्याच्या पार्श्वभूमीवर १६०० कर्मचाऱ्यांचे दोन दिवशीय प्रशिक्षण वर्ग येवल्यात पार पडला.
येथील महात्मा फुले नाट्यगृहासह जनता विद्यालयात दोन रविवार (दि.७) व सोमवार (दि.८) या दोनिदवसात दोन सत्रात सकाळी ११ ते २ व दुपारी २ ते ५ यावेळेत निवडणूक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिदास वारु ळे, रमेश अन्नदाते, राजेंद्र वारु ळे, प्रकाश बुरुंगळे व २७ क्षेत्रीय अधिकारी यांनी पहिल्या टप्प्यातील ८०० प्रशिक्षणार्थीनी रविवारी दिवसभर प्रशिक्षण घेतले.
या प्रशिक्षणात राजेंद्र पाटील आणि रोहिदास वारु ळे यांनी सर्व मतदान केंद्गाध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचारी तसेच राखीव अधिकारी कर्मचारी यांना निवडणूक कामकाजासंबंधी स्क्र ीनवर विविध विषयाबाबत माहिती देण्यात आली.
सदर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचारी तसेच राखीव अधिकारी व कर्मचारी यांना मतदान यंत्राची हाताळणी करणेबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रारंभीच्या पहिल्या सत्रात सकाळी ११ ते २ या वेळेत चित्रफीतीवरून तर दुपारी २ ते ५ या दुसºया सत्रात प्रत्यक्ष मतदान प्रक्रि या कशी पार पाडणार. याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले.
यानंतर प्रत्येक वर्गात ३० मतदान कर्मचारी वर्गाची विभागणी करण्यात आली. प्रत्येक सत्रातील ६०० कर्मचाºयांना प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची हाताळणी करण्याचे प्रशिक्षण येथील जनता विद्यालयात क्षेत्रीय अधिकारी यांनी १३ मशीनद्वारे प्रशिक्षण दिले. प्रत्यक्ष मतदान केंद्रावर वोटिंग मशीन कसे सील करावयाचे? मतदान केंद्राची मांडणी कशी करायची? प्रशिक्षण वर्गात सर्व कर्मचारी यांना निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी व निवडणुकीचे दिवशी करावयाचे संपूर्ण कामकाजाची माहिती देण्यात आली, तसेच कामकाज पार पाडतांना घ्यावयाच्या दक्षता, भरावयाचे सर्व नमुने व लिफाफे तसेच इतर आवश्यक बाबींची व राज्य निवडणूक आयोगाकडून आलेल्या काही महत्वाचे आदेशांचीही माहिती देण्यात आली. सदर निवडणुकीत भारत निवडणूक आयोगाचे इलेक्ट्रॉनिक मशिनचा वापर यासह अशा अनेक बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.
यंदाच्या मतदान प्रक्रि येत नवीन बदलाची माहिती
मत पडताळणी, दिव्यांग मतदारांना सुविधा, अभिरु प मतदान करण्याची ५० मतांची मर्यादा, मतदानाकरिता एम ३ एचव्हीएम नवीन यंत्र वापर, मतदानात विसंगती आढळल्यास तक्र ार करण्याची मुभा, यानवीन समाविष्ट बाबींची माहिती यावेळी देण्यात आली. दुसरा प्रशिक्षण वर्ग २० व २१ एप्रिल रोजी व तिसरा वर्ग २८ एप्रिलला घेतला जाणार आहे.