ओझर:येथे दिवसेंदिवस वाढत असलेल्या अवैध धंद्यांबाबत स्थानिक पोलिसांनी सर्रास दुर्लक्ष केल्याने त्याची तक्र ार मनसेने थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.मनसेचे योगेश पाटील, जयेश ढिकले व अन्य मनसे पदाधिकाऱ्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृह मंत्रालयात अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत पुराव्यानिशी तक्र ार केली आहे.ओझर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. त्यात प्रामुख्याने आॅनलाइन रोलेट, बिंगो, पत्यांचे क्लब, अवैध दारू तसेच गुटखा बंदी असून दररोजची होणारी लाखोंची उलाढाल यांचा समावेश आहे. याच जुगारी खेळामुळे परिसरात तीन तरु णांनी आत्महत्या केल्या असून अनेक तरु ण व त्यांचे कुटुंब देशोधडीला लागले आहे.यात एचएएल मधील युवा कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात कर्जबाजारीपणात अडकला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.यात पोलिसांनी धाड मारून जुगारी खेळ बंद करण्याचा प्रयत्न केला पण आता मोबाईल अॅपद्वारे सदरचा खेळ सुरू आहे. यावर सायबर क्र ाईमने लक्ष्यक्ष्य देणे गरजेचे बनले आहे. तसेच गुटखा विक्र ी संबंधी त्यास बंदी असताना देखील अर्थपूर्ण संबंधामुळे त्याची सर्वत्र खुलेआम विक्र ी सुरू असून तरु णाई कर्करोगाने ग्रस्त होत आहे.यामुळे स्थानिक पोलिस जरी आर्थिक हित जोपासत याकडे कानाडोळा करत असेल तरी वरिष्ठ स्तरावरून यावर तात्काळ कार्यवाही करावी जेणेकरून येणारी पिढी आर्थिक विळख्यात न अडकता सुखरूप राहील. या सर्व प्रकरणी तात्काळ कार्यवाही न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे योगेश पाटील यांनी सांगितले आहे.सदर निवेदन त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, नाशिकचे पालकमंत्री, निफाडचे आमदार, पोलीस महानिरीक्षक व जिल्हाधिकारी यांना पाठवले आहे.सध्या रोज कोरोनाग्रस्त संख्या वाढत असताना ओझर हे सर्वच अवैध धंद्यांचे केंद्रबिंदू झाले आहे. कडक लॉकडाऊनच्या वेळी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी कायदा व कलम वर बोट ठेवत काम केले. परंतु त्यावेळी सरकारने बधितांची संख्या जास्त होऊ नये म्हणून लोकांवर कायद्यांचे कडक बंधन लादले.यात देखील वेळ, नियम, फिजिकल डिस्टनसिंग आदी नियंमांवर बोट ठेवत काही स्थानिक पोलिसांनी व अधिकाºयांनी अनेक व्यापाºयांना नोटिसा धाडत त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करत लाखोंची उलाढाल केल्याचेबोललेजातआहे.तेव्हा मात्र कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात होती. खरेतर जेवढा बडगा व्यापारी बांधवावर लादला गेला तेवढाच अवैध धंद्याबाबत का नाही असा सवाल सामान्य नागरिक विचारू लागले आहे. यामुळेच मनसे व त्यांच्या विद्यार्थीसेनेने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. सदर निवेदनावर पदाधिकºयांच्या सह्या आहेत.
ओझरच्या अवैध धंद्यांची तक्र ार थेट मुख्यमंत्र्यांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 17:08 IST
ओझर:येथे दिवसेंदिवस वाढत असलेल्या अवैध धंद्यांबाबत स्थानिक पोलिसांनी सर्रास दुर्लक्ष केल्याने त्याची तक्र ार मनसेने थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
ओझरच्या अवैध धंद्यांची तक्र ार थेट मुख्यमंत्र्यांकडे
ठळक मुद्देकोरोना स्थानिक पोलीस अर्थकारणात व्यस्तमनसेचे निवेदन