महाराष्ट्र बँकेच्या पेठ शाखेत गैरव्यवहार झाल्याची तक्र ार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:17 IST2017-08-10T23:18:27+5:302017-08-11T00:17:37+5:30
खातेदाराने भरलेली रक्कम संबंधिताच्या खात्यावर न भरता रोखपालाकडूनच परस्पर हडप करण्याचा प्रकार महाराष्ट्र बँकेच्या पेठ शाखेत घडला असून, सदरचा प्रकार उघडकीस आल्यानंतर रोखपालाने हडप केलेली रक्कम ग्राहकाच्या खात्यावर भरण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

महाराष्ट्र बँकेच्या पेठ शाखेत गैरव्यवहार झाल्याची तक्र ार
पेठ : खातेदाराने भरलेली रक्कम संबंधिताच्या खात्यावर न भरता रोखपालाकडूनच परस्पर हडप करण्याचा प्रकार महाराष्ट्र बँकेच्या पेठ शाखेत घडला असून, सदरचा प्रकार उघडकीस आल्यानंतर रोखपालाने हडप केलेली रक्कम ग्राहकाच्या खात्यावर भरण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
ओरंबे येथील सुनीता माधव पवार यांनी १५ मे रोजी पेठच्या महाराष्ट्र बँकेच्या खात्यावर ४६ हजार रुपये भरणा केला. रक्कम भरणा केल्याबाबतची पावतीही देण्यात आली. मात्र एक महिन्यांनी ग्राहकाने पैसे काढण्यासाठी स्लीप भरली असता त्यांच्या खात्यावर रक्कमच नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत भरणा केलेल्या रकमेचा पुरावा सादर केला.
या प्रकाराने घाबरलेल्या रोखपालाने ग्राहकाच्या खात्यावर दोन वेळा रक्कम भरणा करून प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. असाच प्रकार गुरु वारी पुन्हा यांच्याच बाबतीत घडून आल्याने पवार यांच्या नातेवाइकांनी शाखाधिकाºयांना घेराव घालून कागदपत्रांची छाननी करून संबंधित कर्मचाºयावर कायदेशीर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवून ग्राहकाची रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले.