पुरवठा खात्याविरुद्ध राज्यपालांकडे तक्रार
By Admin | Updated: August 12, 2016 23:24 IST2016-08-12T23:21:52+5:302016-08-12T23:24:11+5:30
पुरवठा खात्याविरुद्ध राज्यपालांकडे तक्रार

पुरवठा खात्याविरुद्ध राज्यपालांकडे तक्रार
नाशिक : रेशन दुकानदारांच्या राज्यव्यापी संपात सहभागी असलेल्या दुकानदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांचे परवाने रद्द करण्याच्या नोटिसा देणाऱ्या पुरवठा खात्याच्या विरोधात थेट राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे तक्रार केली आहे.
या संदर्भात जनता दलाचे गिरीश मोहिते यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात रेशन दुकानदार व केरोसीन विक्रेत्यांचे कमिशन वाढ व अन्य मागण्यांसाठी बेमुदत संपावर असून, राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता, हा संप मिटणे गरजेचे असले तरी, त्यासाठी रेशन दुकानदारांच्या मागण्यांकडे शासन लक्ष देत नाही. मात्र संपावर गेलेल्या दुकानदारांना परवाने रद्द करण्याच्या नोटिसा देऊन पुरवठा खाते दडपशाहीचा मार्ग अवलंबित आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करून परवानाधारकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.