शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

कार्यालयीन अधीक्षकांकडून पैशांच्या मागणीची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:28 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना शासन आदेशानुसार आश्वासित पदोन्नती देण्यास प्रशासनाने प्राधान्य देत यापूर्वी शेकडो कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ दिला असला तरी, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह काही विभागांत अशा पदोन्नती देण्याच्या नावाखाली कार्यालयीन अधीक्षकांकडून कर्मचाºयांकडे पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारीची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी घेतली असून, त्या संदर्भात मुख्यालयातील सर्व कार्यालयीन अधीक्षकांची संयुक्त बैठक घेऊन चांगलीच तंबी दिल्याचे वृत्त आहे.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना शासन आदेशानुसार आश्वासित पदोन्नती देण्यास प्रशासनाने प्राधान्य देत यापूर्वी शेकडो कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ दिला असला तरी, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह काही विभागांत अशा पदोन्नती देण्याच्या नावाखाली कार्यालयीन अधीक्षकांकडून कर्मचाºयांकडे पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारीची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी घेतली असून, त्या संदर्भात मुख्यालयातील सर्व कार्यालयीन अधीक्षकांची संयुक्त बैठक घेऊन चांगलीच तंबी दिल्याचे वृत्त आहे.गेल्या आठवड्यातच सामान्य प्रशासन विभागातील ३१८ कर्मचाºयांना आश्वासित पदोन्नती देण्यात आली असून, त्यामुळे कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रशासनाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले असतानाच अन्य विभागांत कर्मचाºयांना पदोन्नती देण्याचे काम केले जात असतानाच काही विशिष्ट कार्यालयीन अधीक्षकांकडून कर्मचाºयांकडून पैशांची मागणी केली जात असल्याच्या थेट तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांच्याकडे करण्यात आल्या. त्यातही आरोग्य विभागात ही बाब प्रकर्षाने होत असून, त्यात आपल्या नावाचा वापर केला जात असल्याची बाब खुद्द आरोग्य अधिकाºयांच्या लक्षात येताच त्यांनीही मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे याची तक्रार केली. त्याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सर्व खात्यांच्या कार्यालयीन अधीक्षकांची बैठक घेण्यात आली. त्यात सर्वांची झाडाझडती घेण्यात येऊन सातव्या वेतन आयोगानुसार चांगले वेतन घेत असतानाही हाताखालच्या कर्मचाºयांकडून पैसे गोळा करताना नीतिमत्ता गहाण ठेवण्याचा प्रकार घडत असून, त्याबाबतच्या तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचल्याचे सांगितले.--------------------कोणत्याही कामाची फाइल कार्यालयीन अधीक्षकाच्या टेबलावर एक दिवसाच्या पुढे प्रलंबित राहता कामा नये, अशी तंबी देतानाच यापुढे ज्या कोणाची तक्रार येईल त्यांना नोटीस न बजावता थेट निलंबित करून नंतरच चौकशी व अन्य बाबी केल्या जातील, असा इशारा दिला. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीनंतर सर्वच कार्यालयीन अधीक्षकांचे धाबे दणाणले.

टॅग्स :Nashikनाशिक