‘केबीसी’ विरोधात पोलिसांत तक्रारी सुरूच !
By Admin | Updated: July 14, 2014 00:32 IST2014-07-13T23:10:46+5:302014-07-14T00:32:57+5:30
‘केबीसी’ विरोधात पोलिसांत तक्रारी सुरूच !

‘केबीसी’ विरोधात पोलिसांत तक्रारी सुरूच !
नाशिक : जिल्ह्यासह मराठवाड्यातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फ सवणूक करणाऱ्या येथील केबीसी मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेड अॅण्ड रेसॉर्टचे संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण, आरती भाऊसाहेब चव्हाण, बापू छबू चव्हाण यांच्याविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात तक्रारी सुरूच आहेत़ या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या आणखी काही नागरिकांनी रविवारी आडगाव पोलिसांकडे तक्रारी केल्या़ दरम्यान, दिवसेंदिवस तक्रारदारांची संख्या वाढत असून, सुमारे २५०० कोटींची ही फसवणूक असल्याचे सांगितले जाते़
मुंबई-आग्रा महामार्गावरील श्रीरामनगरमध्ये कार्यालय असलेल्या केबीसी मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांवर शहर आर्थिक गुन्हे शाखेने ८ मार्चला मनी सर्क्युलेशन स्कीम बँकिंग अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला होता़ कंपनी कायदा १९५६ नुसार सामान्य नागरिकांना सभासद बनवून त्यांना विविध स्कीमद्वारे नोंदणी करून सभासद होण्यास व जास्तीत जास्त रक्कम तत्काळ व सुलभरीत्या काहीएक न करता मिळतील, असे आमिष दाखवून रक्कम जमा केल्याचा आरोप ठेवून ४ कोटी ६६ लाख एक हजार ७८० रुपये जप्त केले होते़
पिंपळणारे येथे राहणारे एकनाथ खैरनार यांनी ११ जुलैला केबीसी कंपनीच्या संचालकांविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात फ सवणुकीची फिर्याद दिल्यानंतर गुुंतवणूकदारांचा ओघ सुरू झाला असून, काही एजंटही तक्रारीसाठी पुढे आले आहेत़ गुंतवणूकदारांची ही फ सवणूक अडीच हजार कोटींपर्यंत असण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे़ दरम्यान, केबीसी कंपनी मिनिस्ट्री आॅफ कार्पोरेट अफे अर्स डीन नंबर ०२७९२७२२ ने रजिस्टर्ड असून, सेबीला कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करता येणे शक्य आहे़