जिल्हा शल्य चिकित्सकांची उपसंचालकांकडे तक्रार
By Admin | Updated: October 14, 2015 23:13 IST2015-10-14T23:08:01+5:302015-10-14T23:13:30+5:30
जिल्हा शल्य चिकित्सकांची उपसंचालकांकडे तक्रार

जिल्हा शल्य चिकित्सकांची उपसंचालकांकडे तक्रार
नाशिक : शासनाने उस्मानाबाद येथे बदली केलेले व विविध कारणांमुळे चर्चेत आलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एकनाथ माले बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसून त्यांच्याविरोधात रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी आरोग्य उपसंचालकांकडे तक्रार केली असून निवेदन दिले आहे़
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनी काही दिवसांपूर्वी रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीबाबत माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली होती़ त्यामध्ये अधिकारी व कर्मचारी कामाकडे दुर्लक्ष करीत असून खासगी रु ग्णालयातील कामांना प्राधान्य देत असल्याचे डॉ. माले यांनी सांगितले होते़ तसेच रुग्णांना खासगी प्रयोगशाळेत वैद्यकीय चाचणीसाठी पाठविले जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता़ जिल्हा शल्य चिकित्सकांनी केलेल्या या वक्तव्याची रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून बुधवारी (दि. १४) आरोग्य उपसंचालक डॉ़ एस़ पी़ पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे़ निवेदनावर डॉ. पंकज गाजरे, डॉ. प्रमोद चेवले, डॉ. उत्कर्ष दुधारिया, डॉ. एस. पवार, डॉ. कल्पना व्यवहारे, डॉ. जी. एम. होले, डॉ. एस. आर. पाटील आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)