शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

वितरण कंपनीच्या विरोधात तक्रारीचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:42 IST

वायरमन नाही, वायर नाही, सिंगल फेजींग असतांना वीजेचे जाणे येणे, भारनियमन, वीजेचे गट्टे उपलब्ध नसणे,रोहीत्र बिघडले तर तीन ते सहा महिने मिळत नाही, आॅईल नाही, रोहीत्र घेण्यासाठी केली जाणारी पैशांची मागण तर वीज वितरणचे कर्मचारी ‘‘ पंटरमार्फत ’’वीजेची केली जाणारी कामे, पुन्हा त्यांना पैसे द्यावे लागतात असा आरोप बैठकीत उघडपणे विजवितरण कपंनीच्या विरोधात शेतकºयांनी केल्याने उपस्थित अधिकारी अवाक झाले.

ठळक मुद्देचांदवड : दुष्काळात शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची राहुल अहेर यांचे आवाहन

चांदवड : वायरमन नाही, वायर नाही, सिंगल फेजींग असतांना वीजेचे जाणे येणे, भारनियमन, वीजेचे गट्टे उपलब्ध नसणे,रोहीत्र बिघडले तर तीन ते सहा महिने मिळत नाही, आॅईल नाही, रोहीत्र घेण्यासाठी केली जाणारी पैशांची मागण तर वीज वितरणचे कर्मचारी ‘‘ पंटरमार्फत ’’वीजेची केली जाणारी कामे, पुन्हा त्यांना पैसे द्यावे लागतात असा आरोप बैठकीत उघडपणे विजवितरण कपंनीच्या विरोधात शेतकºयांनी केल्याने उपस्थित अधिकारी अवाक झाले.असता वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंग जनवीर यांनी सर्वच शाखा अभियंता व कार्यकारी अभियंता यांना कामाबाबत अशा प्रकारच्या तक्रारी येत असेल तर त्या अधिकाºयांची गय केली जाणार नाही तर वेळप्रसंगी त्यांना घरी पाठवू असा सज्जड दमही त्यांनी दिला तर चांदवड तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे.शेतकºयांना पावसाने साथ दिली नाही तर कमीत कमी विजवितरण कंपनीने साथ द्यावी अशी अपेक्षा आमदार डॉ. राहुल अहेर यांनी व्यक्त केली तर जनवीर यांनी चांदवड तालुक्यातील तक्रारीमध्ये येत्या महिनाभरात सुधारणा न झाल्यास संबधीत अधिकारी व कर्मचाºयांना जाब विचारु दरम्यान शेतकºयांनी व नागरीकांनी आपले विज वितरण कंपनीचे कामे करुन घेतांना वीज वसुलीकडे लक्ष द्यावे व वीजचोरी करु नये असे आवाहन जनवीर यांनी बैठकीत केले.या बैठकीत वडाळीभोई उपकेंद्रातील शाखा अभियंता सुनील गांगुर्डे यांचेवर सोग्रसचे भास्करराव गांगुर्डे, सुभाष पुरकर, निवृत्ती घुले, वसंत पगार, विलास भवर, नितीन अहेर, काका काळे, संपतराव पाटील, चंद्रकांत पाटील यांनी समोरासमोर आरोप करीत हे अधिकारी नागरीकांना चांगली उत्तरे देत नाहीत तर वीज वितरणांची कामे एका ‘‘पंन्टरकडून ’’ करतात रोहीत्र नादुरुस्त होऊन तीन महिने झाले तरी त्याकडे लक्ष दिले जात नाही तर पैसांची मागणी केली जाते असा आरोप केल्याने मुख्यअभियंता जनवीर यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले तर यावेळी शिंगवे येथील किरण बोरसे यांनी शिंगवे परिसरातील वीजेचा गट्टा कायमस्वरुपी जळतो व वीजेचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी वारंवार सांगुनही ती कामे केली जात नाही असे सांगीतले तर वायरमन, वीजेचे भारनियमन, वायरमन नाही, अशा तक्रारीचा पाढा चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, शिवसेना उपप्रमुख नितीन अहेर, विलास ढोमसे, पुरीचे बापु भवर,पुरीचे गांगुर्डे आदिसह ग्रामीण भागातील नागरीकांनी व शेतकºयांनी मांडल्या तर चांदवड येथील फिल्टर युनिटचे लोखंडे व श्रीमती मानकर यांची कार्यालयात अत्यंत अरेरावी असून ते शेतकºयांना व लोकप्रतिनिधीना व्यवस्थीत उत्तरे देत नाहीत असा आरोप नितीन अहेर व अनेकांनी बैठकीत केला. ही बैठक तब्बल तीन ते साडेतीन तास चालली यावेळी प्रभाकर ठाकरे, मनोज शिंदे, अ‍ॅड. शांताराम भवर, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, अण्णासाहेब शिंदे, भीमराव निरभवणे, गणपत ठाकरे, विठ्ठल आवारे, देवीदास अहेर, बाळासाहेब शेळके, आदिसह चांदवड तालुक्यातील नागरीक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीजpanchayat samitiपंचायत समिती