रस्तादुरूस्तीचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार
By Admin | Updated: July 12, 2014 00:30 IST2014-07-11T22:31:14+5:302014-07-12T00:30:25+5:30
रस्तादुरूस्तीचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार

रस्तादुरूस्तीचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार
मालेगाव : येथील महानगरपालिकेने सोयगाव ते चर्च या दरम्यान रस्त्यावरील बुजविलेले खड्ड्यांचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने परिसरात कचखडी पसरलेली आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
येथील सोयगाव ते चर्च या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून, नागरिकांनी हे खड्डे बुजवून रस्ता दुरुस्तीची मागणी अनेकवेळा केली होती. त्यामुळे महानगरपालिकेने गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी या रस्त्यातील अंबिका कॉलनीजवळील काही खड्डे बुजविले. यासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने हे खड्डे दुरुस्तीनंतर एकाच दिवसात जैसे थे झाले. हे खड्डे बुजविण्यासाठी बारीक खडी न वापरता मोठी खडी वापरण्यात आली. त्यावर नाममात्र डांबर टाकण्यात आले. या खडीवर डांबर टाकल्यानंतर त्यावर रोलर फिरविणे आवश्यक असताना संबंधित ठेकेदाराने रोलर न फिरविल्याने बुजविलेल्या या खड्ड्यांमधून तासाभरानंतर कचखडी निघण्यास सुरुवात झाली होती, तर गेल्या दोन ते तीन दिवसात यातील काही खड्डे पुन्हा जैसे थे झाले.