घरकुल योजनेत घोटाळा झाल्याची तक्रार
By Admin | Updated: January 10, 2017 01:12 IST2017-01-10T01:12:05+5:302017-01-10T01:12:18+5:30
घरकुल योजनेत घोटाळा झाल्याची तक्रार

घरकुल योजनेत घोटाळा झाल्याची तक्रार
नाशिक : पंचवटीतील मजूरवाडी येथे राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेत माजी नगरसेवक रिमा भोगे व भगवान भोगे यांनी स्वीकृत सदस्य असताना काही नागरिकांकडून आर्थिक देवाण-घेवाण करून लाभार्थी नसलेल्या लोकांना लाभार्थी बनविले असल्याची तक्रार नगरसेवक समाधान जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.
२००७ रोजी हा प्रकार घडल्याचे जाधव यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. सदर माहिती अधिकारात महापालिकेकडून कागदपत्रे मागविले असता ते लाभार्थी खोटे असल्याचे आढळतात. तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम व अतिरिक्त आयुक्त यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली, मात्र त्या दोघांच्याही बदल्या झालेल्या आहेत. घरकुल योजनेत समावेश केलेले लाभार्थी हे भोगे यांच्या नात्यातील आहेत. याशिवाय प्रभाग क्रमांक १० मधील वाल्मीकनगर येथील अंगणवाडी (बालवाडी) माजी नगरसेवक भोगे यांनी १९९२ रोजी नगरसेवक असताना तेथिल मोकळा भूखंड ताब्यात घेऊन त्यावर महापालिकेत ठराव करून आपल्या स्वत:ची संस्था असलेल्या विविध विकास मंडळाच्या नावाने बालवाडीचा ठराव करून ती आपल्या समर्थक असलेल्या निर्मला वसंत पाटील यांना बेकायदेशीर विक्री केली असून, मनपा अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर सदरचा भूखंड मनपाची मालमत्ता असल्याचे उघड झाल्याचेही जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)