टोकडे येथे गॅस सिलिंडर वाटपात अपहाराची तक्रार

By Admin | Updated: August 4, 2014 00:42 IST2014-08-03T21:16:58+5:302014-08-04T00:42:10+5:30

टोकडे येथे गॅस सिलिंडर वाटपात अपहाराची तक्रार

Complaint about the gas cylinder disruption at Tokedo | टोकडे येथे गॅस सिलिंडर वाटपात अपहाराची तक्रार

टोकडे येथे गॅस सिलिंडर वाटपात अपहाराची तक्रार

 

मालेगाव : तालुक्यातील टोकडे येथे आदिवासींना वनसमितीच्या माध्यमातून वाटण्यात येणाऱ्या गॅस शेगड्या व सिलिंडरच्या वितरणात अपहार करण्यात आला असून, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाऊलाल निमडे व संजय रंधवा यांनी जिल्ह्याच्या मुख्य वनाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यात वनविभागामार्फत अवैध जंगलतोड थांबविण्यासाठी वनसमितीच्या माध्यमातून आदिवासींना गॅस सिलिंडर व शेगड्यांचे वाटप केले जाते. तालुक्यातील टोकडे येथे या योजनेत लाभार्थींकडून प्रत्येकी तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले असून, त्यांना गॅस शेगडी व सिलिंडरचे वाटप करण्यात आलेले नाही. त्याऐवजी वनसमितीने अपहार करत मोठ्या रकमा घेऊन नियमबाह्य पद्धतीने वाटप केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यात वनसमितीने एकाच घरातील अनेक व्यक्तींच्या नावावर गॅसचे वितरण केले असून, यात लहान मुलांच्या नावांचा समावेश आहे. समितीनी हे वाटप करताना लाभार्थी व ग्रामपंचायत यांची मंजूर घेणे आवश्यक असताना ती घेण्यात आलेली नाही. या विषयी वनाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी समितीला लाभार्थ्यांचे पैसे परत करण्यास सांगितले होते. मात्र समितीने अद्याप पैसे दिलेले नाहीत. या प्रकरणातील अपहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



निवेदनावर आकाश गायकवाड, अमोल गायकवाड, मोहन सोनवणे, गणेश गायकवाड, श्रीराम वाघ आदिंसह २५ लाभार्थ्यांच्या सह्या व अंगठे आहेत.

Web Title: Complaint about the gas cylinder disruption at Tokedo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.