बंधार्‍याचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार

By Admin | Updated: May 21, 2014 00:15 IST2014-05-21T00:15:28+5:302014-05-21T00:15:28+5:30

एकलव्यनगर (ठाकरवाडी) जवळील चिपाचा नाल्यावरील बांधण्यात येत असलेले सीमेंट प्लग बंधार्‍याचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार माजी सरपंच दामोदर गर्जे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Complaint about the collapse of the bund | बंधार्‍याचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार

बंधार्‍याचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार

नांदूरशिंगोटे : परिसरातील एकलव्यनगर (ठाकरवाडी) जवळील चिपाचा नाल्यावरील बांधण्यात येत असलेले सीमेंट प्लग बंधार्‍याचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार माजी सरपंच दामोदर गर्जे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हा परिषदेच्या २७०२ लेखाशीर्ष अंतर्गत सीमेंट प्लग बंधार्‍याच्या कामास दोन महिन्यांपूर्वी सुरुवात झाली आहे. मात्र या बंधार्‍याचे काम अतिशय निकृष्ट होत असल्याने आगामी पावसाळ्यात त्यात पाणी साठणार नाहीच; परंतु जोरदार पाऊस झाल्यास हा बंधाराही वाहून जाईल, असे काम सुरू असल्याची तक्रार गर्जे यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता व गटविकास अधिकारी यांना पाठविण्यात आली आहे. ठाकरवाडी गट नं. ३४४ मध्ये चिपाचा नाल्यावर बंधार्‍याच्या कामास प्रारंभ करताना खोलवर पाया घेणे अपेक्षित होते; मात्र त्याचा पाया नियोजित अंदाजपत्रकाच्या खोलीपेक्षा दोन फुटांपेक्षाही कमी घेण्यात आल्याचे गर्जे यांचे म्हणणे आहे. तसेच बांधकाम करताना एक मीटरमध्ये प्रत्येकी नऊ इंच सीमेंट काँक्रीट असून, केवळ मोकळे दगड टाकण्यात आले आहेत. त्यात वाळू अथवा माती टाकण्यात आली नसल्याने व त्यात स्टीलचा वापर करण्याची गरज असतानाही ते वापरण्यात आले नसल्याने हा बंधारा केवळ वरवर दिखावा केला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अंदाजपत्रकातील या सीमेंट बंधार्‍याची उंची कमी करण्यात आली असल्याने बंधार्‍याची साठवण क्षमताच कमी झाल्याने शासनाने केलेल्या लाखो रुपयांचा खर्च पाण्यात जाण्याची भीती त्यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. याबाबत पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब वाघ व पंचायत समितीचे शाखा अभियंता राजवाडे यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार करण्यात आली होती. (वार्ताहर)

Web Title: Complaint about the collapse of the bund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.