बिल्डरने रस्त्यावर अतिक्र मण केल्याची तक्र ार
By Admin | Updated: August 9, 2016 01:00 IST2016-08-09T00:59:24+5:302016-08-09T01:00:01+5:30
बिल्डरने रस्त्यावर अतिक्र मण केल्याची तक्र ार

बिल्डरने रस्त्यावर अतिक्र मण केल्याची तक्र ार
पंचवटी : हिरावाडीतील प्रभाग क्र मांक ३ मधील नऊ मीटर रस्त्यावर ओम कन्स्ट्रक्शन व इन्फ्रास्ट्रक्चर वर्मा या बांधकाम व्यावसायिकाने १० मजली बांधकाम सुरू केले असून, बांधकामालगत दक्षिण बाजूला असलेल्या नऊ मीटर रस्त्यावर रेती, विटा, स्टील असे बांधकाम साहित्य टाकून अतिक्र मण केल्याची तक्र ार नगरसेवक सुनीता शिंदे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
नऊ मीटर रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकल्याने वाघाडी नाल्यात पाणी वाहून जाणारा चेंबर बंद झाला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाचे पाणी परिसरात साचल्याने ठाकरे मळा, मंडलिक मळा, तसेच सावतानगर भागात राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. परिसरात तीन ते चार फूट पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. नऊ मीटर रस्त्यावरील नैसर्गिक नाल्यातून वाहणारे पाणी अतिक्र मणामुळे जात नाही. सदरच्या अतिक्र मणाबाबत मनपा प्रशासनाने तत्काळ पाहणी करून दखल घ्यावी, अशी मागणी शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)