बँक आॅफ महाराष्ट्र मोहाडी शाखेबाबत तक्रार

By Admin | Updated: October 10, 2015 23:14 IST2015-10-10T23:13:46+5:302015-10-10T23:14:43+5:30

बँक आॅफ महाराष्ट्र मोहाडी शाखेबाबत तक्रार

Complaint about the Bank of Maharashtra Mohali branch | बँक आॅफ महाराष्ट्र मोहाडी शाखेबाबत तक्रार

बँक आॅफ महाराष्ट्र मोहाडी शाखेबाबत तक्रार


दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथील बँक आॅफ महाराष्ट्रतील कर्मचारी ग्राहकांना योग्य वागणूक व सेवा देत नसल्याने कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी मोहाडी येथील ग्रामसभेत ग्रामस्थांनी केली आहे.
मोहाडी येथे ग्रामसभेत येथील नागरिकांनी बँक कर्मचाऱ्यांच्या विरोधात आवाज उठविला. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व
बँकांना मुद्रा लोन विषयी ग्रामसभेत जनजागृती करण्याचे आदेश
दिले असतांना येथे मात्र
एकही कर्मचारी उपस्थित नाही
ही बाब सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या लक्षात आणून दिले. तर येथील बँक आॅफ महाराष्ट्र मध्ये मुद्रा लोन विषयी माहिती घेण्यासाठी गेले असता
येथील कर्मचारी उडवा उडवीची उत्तरे देतात. अशिक्षति नागरिकांना तर
येथे अतिशय दुय्यम वागणूक दिली जाते.
या कर्मचाऱ्यांवर त्वरित कार्यवाही करावी अन्यथा मोहाडी ग्रामस्थांतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दत्तात्रय क्षीरसागर, रविंद्र नेवकर, शरद घोलप, जयवंत नेवकर, प्रशांत जाधव आदींसह ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Complaint about the Bank of Maharashtra Mohali branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.