तक्र ारदाराच्या आईला सरपंचाकडून मारहाण
By Admin | Updated: January 31, 2016 23:56 IST2016-01-31T23:54:35+5:302016-01-31T23:56:50+5:30
गुन्हा दाखल : अतिक्रमण केल्याची तक्रार केल्याचे कारण

तक्र ारदाराच्या आईला सरपंचाकडून मारहाण
कळवण : तालुक्यातील मळगाव येथील शासकीय जमिनीवर अतिक्र मण केल्याची तक्रार केली म्हणून मळगावच्या सरपंच, उपसरपंच यांच्यासह दहा जणांनी तक्रारदाराच्या आईला, भावाला व वडिलांना घराबाहेर बोलवून मारहाण केल्याची फिर्याद तक्रारदाराच्या आई जिजाबाई राऊत यांनी कळवण पोलिसांत दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
जगदीश राऊत यांच्या तक्रारी अर्जाची मालेगावचे अपर जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन तहसीलदार, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यासह १२ जणांना नोटीस बजावली असून, ४ फेब्रुवारी २०१६ रोजी उपस्थित राहण्याचे आदेश दिल्याने मळगावच्या अतिक्रमण-धारकांचे धाबे दणाणले आहे.
मळगाव येथील तलाठी चौरे यांनी याबाबत सरपंच मीनाबाई गवळी, उपसरपंच विश्वास ठाकरे, पंडित देशमुख, जिभाऊ देशमुख, सोमनाथ देशमुख, जिभाऊ ठाकरे, जगन गवळी, तुकाराम देशमुख, मीराबाई देशमुख, सोनाबाई देशमुख, ग्रामसेवक यांना अतिक्रमण केले म्हणून अपर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्या कार्यालयात ४ फेब्रुवारी रोजी उपस्थित राहण्याबाबत नोटिसीद्वारे सूचित केल्याने अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे अतिक्रमणाबाबत तक्र ार केली म्हणून संतप्त झालेल्या अतिक्र मणधारकांनी तक्र ारदार जगदीश राऊत यांच्या घरी जाऊन घरासमोर शिवीगाळ केली, सरपंच मीनाबाई गवळी व उपसरपंच विश्वास ठाकरे यांनी तक्रारदाराची आई जिजाबाई राऊत यांना घराबाहेर बोलवून शिविगाळ करून मारहाण केली. गळ्यातील सोन्याची मनचली तोडून दहा हजार रुपयांचे नुकसान केले, सोडवणूक करण्यासाठी आलेले पती, मुलगा व नातेवाइकांना विश्वास जिभाऊ ठाकरे व जिभाऊ गंगाराम देशमुख यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अतिक्रमण काढण्याबाबत पुन्हा तक्रारी अर्ज केला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही असा दम दिला, अशी फिर्याद जिजाबाई राऊत यांनी कळवण पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. याबाबत कळवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)