स्पर्धेत दुष्काळाचे प्रतिबिंब
By Admin | Updated: September 21, 2015 23:16 IST2015-09-21T23:03:24+5:302015-09-21T23:16:37+5:30
येवला : गौरी सजावटीत कर्जबाजारी शेतकरी अग्रभागी

स्पर्धेत दुष्काळाचे प्रतिबिंब
येवला : महालक्ष्मी सणानिमित्त धडपड मंचतर्फे घेण्यात आलेल्या महालक्ष्मी सजावट स्पर्धेत दुष्काळामुळे कर्जबाजरी झालेल्या शेतकऱ्यांचे देखावे सादर करण्यात आले. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या पुढाकारातून गेल्या २१ वर्षांपासून धडपड मंचच्या माध्यमातून ही स्पर्धा नियमित होते. यंदाही महिलांचा सहभाग व उत्साह उल्लेखनीय होता.
यंदा पारंपरिक पद्धतीची सजावट तर होतीच; शिवाय त्याला जोडून कुंभमेळा, पाणी हेच जीवन,
पंढरीची वारी, शहर हे येवला, कोकिळा व्रत, कर्जबाजारी शेतकरी, समुद्रमंथन, तिरुपती बालाजी, जय मल्हार, माउलीचे रिंगण, पारंपरिक शेती, भिंत चालवलेली जनाबाई, मंगळागौर, आई-वडिलांना विसरू नका, स्वामी समर्थ वारुळातून प्रकटताना असे प्रबोधन व धार्मिक देखावे महिलांनी मोठ्या मेहनतीने सादर केले.
विशेष म्हणजे, यात बरेच देखावे हे चलत होते. स्पर्धकांपैकी प्रथम 13 क्र मांकांना स्मृतिचिन्ह व उपयुक्त अशी भेटवस्तू देण्यात आली. परीक्षक म्हणून राजश्री पहिलवान, प्रीतिबाला पटेल, माया टोणपे यांनी काम पाहिले.
यशस्वी स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे- १) उषा पैजणे, २) सौ. नीता डालकरी, ३) रेखा लाड, ४) सई काथवटे, ५) रेखा कोष्टी, ६) कल्पना भागवत, ७) ज्योती बाबर, ८) पल्लवी ढोपरे, ९) अनिता रोडे, १०) मंदा दोडे, ११) वासंती जोशी, १२) वंदना कांबळे, १३) छाया शिंत्रे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. खांगटे, नारायणमामा शिंदे, प्रभाकर आहिरे, मुकेश लचके, दत्ता कोटमे, मयूर पारवे, गोपाळ गुरगुडे, प्रा. दत्तात्रय नागडेकर, रमाकांत खंदारे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)