तालुक्यातील ५८६८ शेतकऱ्यांसाठी १ कोटी ४३ लाख रुपयांची नुकसानभरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 01:01 IST2020-11-28T18:26:46+5:302020-11-29T01:01:49+5:30
कळवण : तालुक्यात १२ ते १४ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे मका, बाजरी, सोयाबीन व इतर शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ९० गावातील ५८६८ शेतकऱ्यांना शासनाकडून १ कोटी ४३ लाख ४६ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली असून, पीक पंचनामे करताना शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक घेण्यात आले असल्यामुळे भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.

तालुक्यातील ५८६८ शेतकऱ्यांसाठी १ कोटी ४३ लाख रुपयांची नुकसानभरपाई
कळवण : तालुक्यात १२ ते १४ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे मका, बाजरी, सोयाबीन व इतर शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ९० गावातील ५८६८ शेतकऱ्यांना शासनाकडून १ कोटी ४३ लाख ४६ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली असून, पीक पंचनामे करताना शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक घेण्यात आले असल्यामुळे भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.
अवकाळी पावसामुळे १०७७३ शेतकऱ्यांच्या २८७५ हेक्टर क्षेत्रातील मका, बाजरी, सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी १ कोटी ९५ लाख ५१ हजार ३६० रुपये नुकसानभरपाईचा निधी मागणीचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठवला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ९० गावांतील ५८६८ शेतकऱ्यांना १ कोटी ४३ लाख ४६ हजार ३६० रुपये नुकसानभरपाई प्राप्त झाला असून, दुसऱ्या टप्प्यात ६० गावांतील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे, असे पवार यांनी सांगितले.
तहसीलदार बी. ए. कापसे, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांच्यासमवेत आमदार पवार यांनी बाधित गावांतील पिकांची पाहणी करून जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना नुकसानीची माहिती देत भरपाई देण्याची मागणी केली होती.
सरकारकडे पाठपुरावा केल्यामुळे अभोणा, अंबापूर, अंबिका ओझर, अंबुर्डी (बु), अंबुर्डी (खुर्द), आमदर, आठंबे, बगडू, बालापूर, बार्डे, जुनी बेज, बेलबारे, बेंदीपाडा, भादवण, भगुर्डी, भाकुर्डे, भांडणे (हा ), भांडणे (पि), भेंडी, भुताने(दि), बिजोरे, बिलवाडी, बोरदैवत, चाचेर, चणकापूर, चिंचोरे, दह्याने (दि), दळवट आदी ९० गावातील ५८६८ शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून १ कोटी ४३ लाख ४६ हजार रुपये मंजूर झाले असून, ६० गावांतील शेतकऱ्यांची नुकसानभरपाई अद्याप बाकी आहे.