विल्होळी येथील कंपनी कामगार वेतनापासून वंचित

By Admin | Updated: October 12, 2016 23:16 IST2016-10-12T23:02:13+5:302016-10-12T23:16:30+5:30

विल्होळी येथील कंपनी कामगार वेतनापासून वंचित

The company in Vilholi deprived of workers' wages | विल्होळी येथील कंपनी कामगार वेतनापासून वंचित

विल्होळी येथील कंपनी कामगार वेतनापासून वंचित

 नाशिक : विल्होळी येथील पावरडील एनर्जी सिस्टीम कंपनीतील टाळेबंदी उठविल्यानंतर कामगारांना सहा महिन्यांपासून पगार मिळत नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी कामगारांकडून होत आहे.
पावरडील एनर्जी या कंपनीने दि. ११ नोव्हेंबर २0१५ रोजी टाळेबंदी उठविल्यानंतरही सुमारे एक वर्षापासून कुठल्याही प्रकारचे नवीन काम सुरू झालेले नाही. कामगारांना खोटी आश्वासने देऊन वेठीस धरण्यात येत आहे. तसेच कंपनीमधील कामगारांना मे ते सप्टेंबर २0१६ सुमारे पाच महिन्याचे वेतन मिळाले नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे कंपनीमधील विज व पाणी पुरवठा बंद करून मानसिक त्रास देण्यात येत आहे. तसेच राजीनामा देण्यासाठी दबाव आणण्यात येत
आहे.
याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी कामगारांनी केली असून, यासंबंधी दिलेल्या निवेदनावर श्याम तपासे, राजेंद्र पाटील, मंगेश शिंदे, रघुनाथ गतीर, प्रकाश भोर, कुणाल सोनवणे, गोरख राक्षे, समाधान जाधव, चंद्रकांत चव्हाण, संदीप वरखेडे, सुनील भामरे, संदीप खोतकर, रामदास चव्हाण आदिंसह १२७ कामगारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The company in Vilholi deprived of workers' wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.