कंपनीला सव्वानऊ लाखांचा गंडा

By Admin | Updated: January 25, 2016 22:51 IST2016-01-25T22:51:54+5:302016-01-25T22:51:55+5:30

कंपनीला सव्वानऊ लाखांचा गंडा

The company has a total of Rs | कंपनीला सव्वानऊ लाखांचा गंडा

कंपनीला सव्वानऊ लाखांचा गंडा

नाशिक : अकाउंट हॅक करून इंटरनेट व बँकेच्या आरटीजीएस प्रणालीद्वारे एका कंपनीला सव्वानऊ लाख रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले असून, या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित मोहित गुप्ता याच्यावर आयटी अ‍ॅक्टन्वये गुन्हा दाखल केला आहे़
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर परिसरातील कामगारनगर येथील साई गार्डन सोसायटीत जगन्नाथ महिपत पवार (७४) राहतात. त्यांची युनिका एंटरप्रायजेस नावाची कंपनी आहे़ संशयित मोहित गुप्ता याने इंटरनेटचा वापर करून १६ ते १८ जानेवारी या कालावधीत कंपनीचे अकाउंट हॅक केले़ कंपनीच्या अकाउंटची माहिती चोरून जगन्नाथ पवार यांच्या बँक खात्यातून (क्रमांक ०८०७३०११०००००३४) दिल्ली येथील आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावर (क्रमांक ११३४०१५११६७) चार लाख ६० हजार रुपये, तर कांदीवली मुंबईतील एस़ के.ट्रेडर्स यांच्या स्टेट बँक आॅफ इंडिया खात्यावर (क्रमांक ३५३४५२७६६४८) चार लाख ६० हजार रुपये असे एकूण ९ लाख २० हजार रुपये आरटीजीएस प्रणालीद्वारे ट्रान्सफर करून घेऊन कंपनीची फसवणूक केली़
कंपनीच्या बँक खात्यातून सव्वानऊ लाखांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जगन्नाथ पवार यांनी अंबड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ (प्रतिनिधी)

Web Title: The company has a total of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.