नाशिक : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या वतीने सामुदायिक व्रतबंध सोहळा संपन्न झाला. तसेच संस्थेमार्फत आदर्श कार्यकर्ता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या पुरस्काराचे मानकरी स्व. मधुसूदन अंबादास कुरुंभटी, तसेच वसंतराव गर्गे, रमेश पैठणकर, वसंतराव कुलकणी ठरले. प्रमुख पाहुणे म्हणून आयबीएन लोकमतचे राजकीय संपादक प्रसाद काथे उपस्थित होते. उपेंद्र शुक्ल, उपेंद्र देव यांनी सूत्रसंचालन केले. पं. रवींद्र देव व वैभव दीक्षित यांनी पौरोहित्य केले. संस्थाध्यक्ष सतीश शुक्ल, कार्याध्यक्ष तुषार जोशी, कार्यवाह अनिल देशपांडे, अॅड. भानुदास शौचे यांनी सर्व सहकार्य केले. तसेच संस्था उपाध्यक्ष माधवराव भणगे, कोषाध्यक्ष चंद्रकांत महाजन, प्रमोद मुळे, महेंद्र गायधनी, राजन कुलकर्णी, अनिल नांदुर्डीकर, धनंजय पुजारी, चंद्रशेखर गायधनी, प्रकाश शुक्ल, दिलीप शुक्ल, प्रतीक शुक्ल, अवधूत कुलकर्णी, उदय जोशी, निखिल देशपांडे, अॅड. सतीश बाल्टे, कांचन पंचाक्षरी, विवेक देव, सतीश जोशी, अरुण कुलकर्णी, सुधाकर गोखले, सुजाता व सतीश करंजीकर आदी उपस्थित होते. या प्रसंगी महंत दिगंबरा आखाडा, रामकिशोरदास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज यांनी बटूंना शुभाशीर्वाद दिले. यावेळी ३० बटू व त्यांचे आप्तस्वकीय उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आमदार सीमाताई हिरे व महेश हिरे यांची खास उपस्थिती होती.
सामुदायिक व्रतबंध सोहळा शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:38 IST
नाशिक : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या वतीने सामुदायिक व्रतबंध सोहळा संपन्न झाला. तसेच संस्थेमार्फत आदर्श कार्यकर्ता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
सामुदायिक व्रतबंध सोहळा शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेचा उपक्रम
ठळक मुद्देआदर्श कार्यकर्ता पुरस्कारांचे वितरण ३० बटू व त्यांचे आप्तस्वकीय उपस्थित