सामुदायिक तुलसीविवाह धूमधडाक्यात
By Admin | Updated: November 25, 2015 22:05 IST2015-11-25T22:04:17+5:302015-11-25T22:05:15+5:30
फटाक्यांची आतषबाजी : वावीसह सुरगाण्यात गोरज मुहूर्तावर लागली टाळी

सामुदायिक तुलसीविवाह धूमधडाक्यात
वावी : येथील विठ्ठल मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर भजनी मंडळाच्या वतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने तुलसीविवाह संपन्न झाला.
येथील जगन्नाथ शिंदे, राजेंद्र खांबेकर यांनी द्वादशीला सामुदायिक तुलसीविवाह साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. काकड आरतीसाठी उपस्थित असलेले रमेश बिडवे, दत्तात्रय विधाते, कमळाबाई जाजू, माधव थोरात यांनी मंजुरी दिली होती.
सायंकाळ होण्यापूर्वी अनेक कुटुंबे सजविलेल्या तुळशीच्या कुंड्या विठ्ठल मंदिराकडे घेऊन येऊ लागले. बालगोपाळांना रंगनाथ हातात घेऊन उपवरदेव बनविण्यात आले. यावेळी रामेश्वर जाजू, सुरेश वेलजाळी, अशोक काळोखे, सचिन पठारे, ओमकार धूत, विश्वास आंबेकर, सीताबाई बिडवे, सपना धूत, मनीषा जाजू, हेमलता जाजू, उज्ज्वला जाजू, संगीता कर्पे, स्वाती कर्पे, मंदा काळोखे, अर्चना आंबेकर, आशा बिडवे, अंजनाबाई गायकवाड, ठकूबाई मंडलिक, सुलोचना विधाते, कुसुम सोमाणी, जयश्री देसाई, मंगल विधाते, ऋषिकेश बिडवे, मंगेश थोरात, सार्थ धूत, अक्षय खर्डे, दीपक विधाते, सचिन दोंदे आदिंसह महिला उपस्थित होत्या. (लोकमत चमू)