पंचवटी : पंचवटीतील नवीन आडगाव नाका परिसरातील स्वामीनारायणनगर परिसरात येत्या सोमवारी श्री हनुमान चालिसा सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सालाबादप्रमाणे यावर्षी श्री महाबली हनुमान मंदिर विश्वस्त, श्रीराम वारकरी विश्वस्त मंडळ, श्री सीतामाई महिला वारकरी विश्वस्त मंडळ पंचवटी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामीनारायणनगर येथील श्री महाबली हनुमान मंदिरात हनुमान चालिसा सामुदायिक पारायण सोहळा होणार आहे. सोमवारी सकाळी श्री पूजन हभप दामोदर महाराज गावले, भरत सांगळे यांच्या हस्ते, हनुमान चालिसा पारायण, दुपारी पारायणाचा महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाला आखाडा परिषद अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज उपस्थित राहणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्य विश्वस्त पोपट फडोळ, रोहिणी सांगळे, विश्वनाथ घुगे आदींनी केले आहे.
हनुमान चालिसाचे सामुदायिक पारायण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:52 IST