पोलिसांनी साधला नागरिकांशी संवाद
By Admin | Updated: October 28, 2015 21:31 IST2015-10-28T21:28:50+5:302015-10-28T21:31:41+5:30
पोलिसांनी साधला नागरिकांशी संवाद

पोलिसांनी साधला नागरिकांशी संवाद
सातपूर : नाशिक शहर पोलिसांनी ‘नागरिकांशी सुसंवाद’ अशी मोहीम सुरू केली असून, सातपूर परिसरात नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींची दखल घेण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले.
नागरिकांना आपल्या अडचणी थेट पोलिसांना सांगता याव्यात यासाठी नाशिक शहर पोलिसांकडून मोहीम सुरू करण्यात आली असून, सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधला. सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज करंजे, दुय्यम निरीक्षक अमृत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक माधवी वाघ यांच्यासह पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारांकडून गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य केले जात आहे. भाजीबाजार, तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणे याबरोबरच परिसरात दहशत पसरविण्याचे प्रकार घडत असतात. याबाबत नागरिकांनी न घाबरता पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले. पोलिसांनी सातपूर कॉलनीतील श्री सप्तशृंगी देवी मंदिरापासून मोहिमेला सुरु वात केली. श्री छत्रपती विद्यालय, अशोकरोड, समतानगर, डॉ. आंबेडकर मार्केट, वीस हजार गाळे वसाहत, आठ हजार वसाहत ते आनंदछायापर्यंत मोहीम राबविण्यात आली.
यावेळी प्रभाग सभापती उषा शेळके, लोकेश गवळी, संजय राऊत आदिंसह उपस्थित होते. (वार्ताहर)