येवल्यात कलागुणांचे दर्शन घडवित गणरायाला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 18:01 IST2018-09-24T18:00:58+5:302018-09-24T18:01:31+5:30
ढोल, बँजो, संबळ वाद्याच्या तालासुरात विविध कलागुणांचे दर्शन घडवित येवल्यातील विविध गणेश मंडळानी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. झांज, काठी लाठी, झांज यासह विविध आगगोळ्यांच्या प्रात्यक्षिकासह क्षत्रिय समाज मंडळाने जुनी आखाडी मच्छ, कच्छ, वराह अवतार, गणपती-शारदा नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. मुख्य मिरवणुकीत 13 गणेश मंडळे सहभागी झाली होती.

येवल्यात कलागुणांचे दर्शन घडवित गणरायाला निरोप
रविवारी सायंकाळी ६ वाजता विसर्जन मिरवणुकीला आझाद चौकातून सुरु वात झाली. प्रारंभी पहिला मानाचा धोंडीराम वस्ताद तालीम संघाचा गणपती आझाद चौकात पावणेसहा वाजता आला. तालमीचे दिवंगत वस्ताद भाऊलाल पहिलवान लोणारी यांच्या प्रतिमेला उपमहाराष्ट्र केसरी पहिलवान राजेंद्र लोणारी, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, प्रभाकर पहिलवान ठाकूर यांनी श्रद्धांजली अर्पण केली व पुष्पहार घातला. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रात्यक्षिके दाखवली. त्या पाठोपाठ बुंदेलपुरा तालीम संघ, काटामारु ती तालीम संघ, जय बजरंग फ्रेंड्स सर्कल, खंडू वस्ताद तालीम संघ, क्र ांती ग्रुप, जय महाराष्ट्र मित्र मंडळ लबक फ्रेंड सर्कल, छत्रपती फौंडेशन, जय भवानी मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, बजरंग दल, परदेशपुरा तालीम संघ ही मंडळे विविध प्रात्यक्षिके दाखवत मिरवणुकीत सहभागी झाली. तब्बल ८ तास गणेश विसर्जन मिरवणूक चालली. आझाद चौकात येवला नगरपरिषद, राष्ट्रवादी कॉंग्रेस व हिंदू मुस्लीम पंच कमिटी, सह्याद्री ग्रुप मधली गल्ली, गंगादरवाजा मित्र मंडळाच्या वतीने प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांचे सत्कार करण्यात आले. सह्याद्री ग्रुपच्या वतीने संगीतमय सांस्कृतिक कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता .अखेरीस साडे अकरा वाजता परदेशपुरा तालीम संघाचा गणपती वाजतगाजत आझाद चौकात आला व रात्री एक वाजेच्या सुमारास श्री गणेश विसर्जनाने मिरवणूकीची सांगता झाली.