महिला सक्षमीकरणासाठी संवाद महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:16 IST2017-09-27T00:16:25+5:302017-09-27T00:16:30+5:30
आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक युगात महिला सुरक्षा व सक्षमीकरणासाठी संवाद अतिशय महत्त्वाचा असून, संवादामुळे समस्या सुटण्यास मदत होते, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या डॉ. आशालता देवळीकर यांनी केले़.

महिला सक्षमीकरणासाठी संवाद महत्त्वाचा
सातपूर : आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक युगात महिला सुरक्षा व सक्षमीकरणासाठी संवाद अतिशय महत्त्वाचा असून, संवादामुळे समस्या सुटण्यास मदत होते, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या डॉ. आशालता देवळीकर यांनी केले़. नवरात्रोत्सवानिमित्त पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर महिला सुरक्षा शाखेच्या वतीने पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून ‘जागर आदिशक्तीचा, स्त्री शक्तीचा’ हा खास महिलांसाठीचा कार्यक्रम सातपूरला घेण्यात आला. डॉ. देवळीकर यांनी कामगार वर्गातील महिलांच्या ‘आरोग्याविषयी असलेल्या समस्या व उपाययोजना’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी यावेळी महिलांना आरोग्याची काळजी घेण्याच्या टिप्सही दिल्या. अॅड. अंजली पाटील यांनी सजग महिला व सक्षम महिला या विषयावर समुपदेशन करत महिलांना कायद्याविषयीची माहिती दिली. प्रारंभी पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार सीमा हिरे, नगरसेवक सलीम शेख, शशिकांत जाधव, माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, सीमा निगळ, दीक्षा लोंढे, पोलीस उपायुक्त माधुरी कागणे, सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, महिला पोलीस अधिकारी सारिका महाजन, रेश्मा अवतारे, सारिका जाधव आदी उपस्थित होते.