शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पुण्याच्या धर्तीवर नाशकातही महापालिका महिला बचतगटांसाठी साकारणार वस्तू विक्री केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 6:43 PM

महापालिकेचे नियोजन : महिला बालकल्याण समितीचा अभ्यास दौरा

ठळक मुद्देनाशिक शहरात महापालिकेकडे उत्पादन करणा-या ७५ महिला बचत गटांची नोंद बचत गटांना गुणवत्तापूर्ण वस्तू उत्पादनासाठी सर्वप्रथम प्रशिक्षण देण्याचे नियोजन

नाशिक - पुणे महापालिकेने महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी राबविलेल्या उपक्रमाच्या धर्तीवर नाशिकमध्येही बचत गटांसाठी केंद्रीय वस्तू विक्री केंद्र उभारण्याचा विचार महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत सुरू असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.महापालिकच्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांनी नुकतीच पुणे महापालिकेला भेट देऊन तेथे महिलांसाठी राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. या अभ्यासदौ-याविषयी बोलताना उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी सांगितले, पुणे महापालिकेने उत्पादन घेणा-या महिला बचत गटांसाठी वस्तू विक्री केंद्र उभारले आहे. त्यासाठी स्माईल या एनजीओमार्फत सदर महिला बचत गटांच्या वस्तू विक्रीसाठी यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तेथील महिला बचत गटांच्या उत्पादनांचा दर्जा कसा उच्चतम राहिल, याचीही दक्षता घेण्यात आलेली आहे. पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिकमध्येही सदर उपक्रम प्राधान्याने राबविण्याचा विचार आहे. नाशिक शहरात महापालिकेकडे उत्पादन करणा-या ७५ महिला बचत गटांची नोंद आहे. या बचत गटांना गुणवत्तापूर्ण वस्तू उत्पादनासाठी सर्वप्रथम प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. नाशिक शहर हे धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने येथे येणा-या यात्रेकरुंच्या दृष्टीने उत्पादन घेण्याबाबत बचत गटांना प्रशिक्षित करण्यात येईल. याशिवाय, महिला बचत गटांना मार्केटिंग आणि पॅकेजिंगचेही प्रशिक्षण दिले जाईल. महापालिकेमार्फत सुमारे एक हजार स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असेल. बचतगटांनी स्वयंनिर्भर व्हावे, हाच हेतू या उपक्रमामागे असल्याचेही दोरकुळकर यांनी सांगितले.सिमला दौ-यासाठी मिळेना ट्रॅव्हल्स कंपनीमहापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीचा सिमला, दिल्ली, आग्रा, अमृतसर या शहरांचाही अभ्यासदौरा आखण्यात आलेला आहे. सदर अभ्यासदौ-यासाठी वाहनापासून ते निवास-भोजन व्यवस्थेसंदर्भात महापालिकेने निविदा प्रक्रिया दोनदा राबविली. पहिल्यावेळी एकाही ट्रॅव्हल्स कंपनीने प्रतिसाद दिला नाही तर दुस-यावेळी केवळ एकच निविदा आली. त्यामुळे, पुन्हा तिस-यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महापालिकेकडून बिले अदा करण्यात विलंब लागत असल्याने कुणीही ट्रॅव्हल्स कंपनी पुढे येत नसल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWomenमहिला