अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत समित्या स्थापन
By Admin | Updated: July 31, 2015 00:15 IST2015-07-31T00:04:34+5:302015-07-31T00:15:13+5:30
अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत समित्या स्थापन

अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत समित्या स्थापन
नाशिक : जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणच्या अनधिकृत धार्मिक स्थळांना नियमित करण्याबरोबरच नियमबाह्य स्थळांचे अतिक्रमण काढून टाकण्याबाबत जिल्हा प्रशासनाने तयारी चालविली असून, जाहीर निवेदन प्रसिद्ध करून अवगत करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही कार्यवाही केली जात असल्याचे याबाबत राज्य सरकारने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. सुमारे २००९ पूर्वी सार्वजनिक ठिकाणी कुठलीही अनुमती न घेता धार्मिक स्थळे उभारण्यात आली असून, अशा धार्मिक स्थळांमुळे रहदारीस अडथळा होण्याबरोबरच सामाजिक प्रश्नही निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत एक तर या धार्मिक स्थळांना कायमस्वरूपी अनुमती देऊन ते नियमित करावेत किंवा त्यांचे अतिक्रमण काढून टाकावे, असे पर्याय शासनाने दिले आहेत. त्यात ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ उभारले असेल म्हणजे खासगी व्यक्तीच्या जागेत वा सार्वजनिक ठिकाणी तर जागामालकाचे ना हरकत प्रमाणपत्र त्याचबरोबर संबंधित प्राधिकरणाचे ना हरकत व पोलीस यंत्रणेचे प्रमाणपत्र त्यासाठी आवश्यक करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)