समितीच्या गाळ्यांचा लिलाव हाणून पाडला
By Admin | Updated: November 14, 2014 00:27 IST2014-11-14T00:09:29+5:302014-11-14T00:27:39+5:30
समितीच्या गाळ्यांचा लिलाव हाणून पाडला

समितीच्या गाळ्यांचा लिलाव हाणून पाडला
सटाणा : येथील बाजार समितीच्या सव्वीस व्यापारी गाळ्यांचा लिलाव अनामत धारकांनी गोंधळ घालुन हाणून पाडला . मात्र नामपूर उपबाजार समतिीच्या आवारातील गाळ्यांची लिलाव प्रक्रि या सुरळीत पार पडली.
सटाणा बाजार समिती आवार व नामपूर उपबाजार आवारात बांधलेल्या व्यापारी गाळ्यांच्या चौकशीचे लावून या गाळ्यांचे वाटप परस्पर न करता जाहीर लिलावाद्वारे करावे आशी मागणी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव यांनी पणनकडे केली होती . त्याची दखल घेत पणनने तसा आदेश बाजार समतिीला दिला होता .त्यानुसार सटाणा बाजार समिती आवारातील 26 आणि नामपूर उपबाजार आवारातील 11 व्यापारी गाळ्यांसाठी दीडशे वर इच्छुकांनी पंचवीस हजार रु पयांची अनामत रक्कम भरून लिलावात सहभाग घेतला . सटाण्याच्या गाळ्यांसाठी प्रशासनाकडून लिलाव प्रक्रि यस प्रारंभ होण्यापूर्वीच गाळ्याचे ठरवलेले साडेपाच लाख रु पयांचे निर्धारित मुल्य अवाजवी असल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष पंकज सोनवणे ,कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम,दीपक रौंदळ ,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन सोनवणे ,आदींनी हरकत घेवून गोंधळ घातला .
दरम्यान या हरकती बरोबरच या लिलाव प्रक्रि यत शेतकरी आण िस्थानिक व्यक्तीला प्राधान्य देऊन पूर्वीच्या गाळा धारकाला लिलाव प्रकीयत सहभागी करू नये अशा अटी घालून लिलाव हाणून पाडला . मात्र नामपूर उपबाजार आवारातील व्यापारी गाळ्यांचा लिलाव सुरळीत पार पडला असल्याचे प्रशासनाने सांगितले .
सटाणा येथील सव्वीस गाळ्यांचे निर्धारित बाजार मुल्य ठरवून गाळ्यांचे वाटप पणन ठरवून दिलेल्या नियमांना अधीन राहून फेर लिलावाचा प्रस्ताव पणन कडे पुन्हा पाठवण्यात येईल . या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर परत लिलाव प्रक्रि या राबवण्यात येईल असे पणनचे अधिकारी देशमुख यांनी सांगितले .