शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या मालमत्तेच्या शोधासाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:22 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी नाशिक शहरासह जिल्'ातील ग्रामीण भाागात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मालकिच्या असलेल्या ...

ठळक मुद्देउत्पन्नाचे स्त्रोत : आॅक्टोबर अखेर अहवाल

नाशिक : जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी नाशिक शहरासह जिल्'ातील ग्रामीण भाागात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मालकिच्या असलेल्या मालमत्तांचा शोध घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी पाच सदस्यीय समिती नेमली असून, आॅक्टोंबर अखेर या समितीने आपला अहवाल सादर करावयाचा आहे.जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या जिल्'ात अनेक ठिकाणी महत्वाच्या ठिकाणी मालमत्ता आहेत. नाशिक शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडीयम, महात्मा गांधी रोडवर जागा असून, नाशिक-त्र्यंबकरोडवरच पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यातही कोट्यवधी रूपये किंमतीची मालमत्ता आहे. अनेक महत्वाच्या जागा विनावापर पडून असून, काहींचे प्रकरणे न्यायालयात प्रलंबीत आहेत. ग्रामीण भागात देखील पंचायत समितीच्या पातळीवर महत्वाच्या ठिकाणी तसेच शहरे व महसुली गावांमध्ये मोक्याच्या जागा पडून आहेत. त्याची एकत्रित माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडे नाही. त्यामुळे काही जागांचा बेकायदेशीर वापर सुरू असून, त्यातून जिल्हा परिषदेला उत्पन्न मात्र मिळत नाही. या संदर्भात गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून अनेक सदस्य, पदाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्या त्या वेळी जिल्हा परिषदेच्या मालकिच्या मालमत्तांचा शोध घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अधिकारी बदलले की सदरचा विषयही बासनात गुंडाळून ठेवण्यात आला. आता मात्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मनावर घेतले आहे.कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात कमालिची घट झाली असून, प्रशासकीय खर्चच जेमतेम भागू लागला आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढीसाठी मोक्याच्या जागांचा शोध घेवून अशा जागा भाडे कराराने अथवा विकसीत करून त्यापासून कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्त्रोत सुरू करण्याचा हेतू यामागे आहे. या मालमत्तांचा शोध घेण्यासाठी पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली असून, त्यात अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी उज्वला बावके, प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रविंद्र परदेशी, कार्यकारी अभियंता मोने यांचा समावेश आहे. जिल्'ातील सर्व मालमत्तांचा शोध व त्याचा सध्याची स्थिती याबाबतचा अहवाल आॅक्टोंबर अखेर देण्याच्या सुचना समितीला देण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदNashikनाशिक