शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
6
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
7
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
8
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
9
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
10
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
11
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
12
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
13
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
14
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
15
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
16
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
17
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
18
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
19
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
20
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 19:32 IST

नाशिक : मराठा समाजाला शंभर टक्के व कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य मागासवर्ग आयोग अहवाल सादर करणार असून, माहिती विश्लेषणासाठी मोठ्या संख्येने मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे़ अहवाल आल्यानंतर तत्काळ विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ठराव करून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले जाणार असून, ते कायमस्वरूपी टिकणारे असेल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले़

ठळक मुद्दे विद्यार्थी वसतिगृह उद्घाटन : १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य मागासवर्ग आयोग अहवाल

नाशिक : मराठा समाजाला शंभर टक्के व कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य मागासवर्ग आयोग अहवाल सादर करणार असून, माहिती विश्लेषणासाठी मोठ्या संख्येने मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे़ अहवाल आल्यानंतर तत्काळ विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ठराव करून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले जाणार असून, ते कायमस्वरूपी टिकणारे असेल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले़

दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजाला मिळणारे आरक्षण हे टिकणारे आरक्षण असणार आहे़ न्यायालयाच्या आदेशानुसार या आरक्षणासाठी आवश्यक असलेला मागासवर्ग आयोगाचा अहवाल वेळेत पूर्ण व्हावा यासाठी पुणे येथे सेवानिवृत्त न्यायाधीश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली वेगाने काम सुरू असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत हा अहवाल प्राप्त होणार आहे़ यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन घेऊन १६ टक्के आरक्षण दिले जाणार आहे़ यासाठी सरकारने निर्धारित कार्यक्रम आखला आहे़ आरक्षणाचा उपयोग हा शिक्षण व नोकरीसाठी होत असून, मराठा समाजाला आरक्षणानंतर मिळणाऱ्या सुविधा या आरक्षणापूर्वीच देण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतलेला आहे़ मराठा समाजातील आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना ५० टक्के शैक्षणिक शुल्क माफ केले आहे़ तसेच प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी वसतिगृह उभारले जाणार असून कोल्हापूर, सांगली, नाशिक व औरंगाबाद याठिकाणी वसतिगृह सुरू झाले आहेत़ भाजपा सरकार मराठा आरक्षण देणार असल्याने विरोधकांची घालमेल सुरू झाली आहे़ मराठा आरक्षण हे राजकारणासाठी नाही तर जबाबदारी व बांधिलकी म्हणून देत असल्याचे पाटील यांनी सांगितले़

जलसंपदा तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, या वसतिगृहात १३० विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली असून, आणखी दोन इमारती अधिगृहीत करून साडेतीनशे विद्यार्थ्यांची सोय केली जाणार आहे़ यामध्ये मुलींची संख्या १२५ असणार असून त्यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृह असणार आहे़ मराठा समाजाचे आरक्षण हे भाजपा सरकार उशिरा सत्तेत आल्याने रखडले होते़ मात्र ही प्रक्रिया आता वेगाने सुरू असून, डिसेंबरअखेर मराठा समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही दिली़ आमदार विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्जासाठीच्या अडचणी दूर करण्याची मागणी केली़ तसेच अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम २५ आॅक्टोबरपासून एल अ‍ॅण्ड टी कंपनी सुरू करणार असून, ते तीन वर्षांत पूर्णत्वास येणार असल्याचे मेटे म्हणाले़

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार जगताप याने केले. यावेळी महापौर रंजना भानसी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, अनिल कदम, डॉ. राहुल आहेर, माजी आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषदेच्या सभापती मनीषा पवार, उपमहापौर प्रथमेश गिते, मनपा स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, सुनील बागुल, लक्ष्मण सावजी आदींसह सकल मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNashikनाशिकStudentविद्यार्थी