किराणा व्यापारी असोसिएशनची बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 22:59 IST2020-04-20T22:58:58+5:302020-04-20T22:59:10+5:30
कोरोनाच्या संकट काळात गोरगरिबांच्या मदतीसाठी माणुसकीचे अनेक हात पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर येवला किराणा असोसिएशनने तालुक्यातील १२५ गरीब कुटुंबांना किराणा माल देऊन आधार दिला आहे.

किराणा व्यापारी असोसिएशनची बांधिलकी
येवला : कोरोनाच्या संकट काळात गोरगरिबांच्या मदतीसाठी माणुसकीचे अनेक हात पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर येवला किराणा असोसिएशनने तालुक्यातील १२५ गरीब कुटुंबांना किराणा माल देऊन आधार दिला आहे. सुमारे १२५ कीट रवाना करण्यात आले. यावेळी तहसीलदार रोहिदास वारु ळे, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, असोसिएशनचे अध्यक्ष राजेश भंडारी, आलकेश कासलीवाल, राजेंद्र चिनगी आदींच्या हस्ते वस्तू गावोगावी पाठविण्यात आले अशी माहिती अध्यक्ष राजेश भंडारी यांनी दिली. आतिश लाड, महेश तक्ते, विनोद लोढा, श्रीकांत चांडक, मयूर मुंदडा, संदीप लाड, बबलू पाटोदकर आदी व्यापाऱ्यांनी या कार्यात वाटा उचलला आहे.