विकासकामांसाठी आयुक्तांना निवेदन
By Admin | Updated: November 18, 2015 22:14 IST2015-11-18T22:12:58+5:302015-11-18T22:14:12+5:30
औद्योगिक वसाहत : विविध संघटना एकत्र

विकासकामांसाठी आयुक्तांना निवेदन
सातपूर : सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीत कायमस्वरूपी सीमेंट कॉँक्रीटचे रस्ते करणे, अग्निशमन केंद्र, भुयारी गटार योजना यांसह विविध सुविधा पुरविण्याची मागणी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे सर्व औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
निमा, आयमा, नाईस, महाराष्ट्र चेंबर्स या औद्योगिक संघटनांनी संयुक्त निवेदन महापालिका आयुक्तांना सादर केले आहे. त्यानुसार औद्योगिक वसाहतीत कायमस्वरूपी सीमेंट काँक्रीटचे रस्ते करणे जे ८० ते १०० टनास टिकतील. बंद पथदीप दुरुस्त करणे, भुयारी गटारीची व्यवस्था करणे, अंबडसाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र सुरू करावे, पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी व्यवस्था करणे, अंबड गावाजवळील अतिरिक्त वसाहतीत मूलभूत सेवासुविधा पुरविणे, विद्युत वाहिन्या भूमिगत करणे, विभागीय ईटीपी प्लांट टाकणे, वाहतूक अभियंता पद निर्माण करणे, वाहतूक बेट व रस्त्यांचे नियोजन करणे आदि मागण्या सोडविण्याची मागणी निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील, महाराष्ट्र चेंबर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, नाईसचे अध्यक्ष विक्रम सारडा, मंगेश पाटणकर, राजू अहिरे आदिंनी केली आहे. (वार्ताहर)