शैक्षणिक शुल्क माफीबाबत आयुक्तांना निवेदन
By Admin | Updated: January 21, 2016 22:39 IST2016-01-21T22:37:50+5:302016-01-21T22:39:22+5:30
शैक्षणिक शुल्क माफीबाबत आयुक्तांना निवेदन

शैक्षणिक शुल्क माफीबाबत आयुक्तांना निवेदन
नाशिक : विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढून अपर जिल्हाधिकारी यांनाही याबाबत निवेदन देण्यात आले.
पावसाअभावी राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी व कष्टकरी जनतेच्या मुलांना शिक्षण अर्धवट सोडावे लागत आहे. शेतकरी, शेतमजूर यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क, वसतिगृह शुल्क, बस पास शुल्क पूर्णपणे माफ करावे. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेली उत्पन्नाची मर्यादा ४.५ लाखांवरून सहा लाख इतकी करावी. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नियमित देण्यात यावी तसेच शैक्षणिक कारणासाठी लागणाऱ्या जात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी असलेल्या जाचक अटी रद्द करून तीन महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्राची वैधता द्यावी आदि मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे गौरव गोवर्धने, अॅड. रवींद्र पगार, अर्जुन टिळे, रंजन ठाकरे, विष्णुपंत म्हैसधुणे, छबू नागरे, सचिन पिंगळे, अंबादास खैरे, हेमंत शेट्टी, दीपक वाघ आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)