शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

करवाढीवर आयुक्त ठाम ;  कर भरण्याची सवय लावून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:59 IST

‘पॉप्युलर होणे माझ्यासाठी खूप सोपे आहे, परंतु मी शहराच्या सुखासाठी आलो आहे. कोणत्याही सुविधा मोफत मिळणार नाहीत. सुविधा हव्या असतील तर कर भरण्याची सवय लावून घ्या,’ असा सल्ला महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमात नाशिककरांना देत करवाढीबद्दल आपली भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले.

नाशिक : ‘पॉप्युलर होणे माझ्यासाठी खूप सोपे आहे, परंतु मी शहराच्या सुखासाठी आलो आहे. कोणत्याही सुविधा मोफत मिळणार नाहीत. सुविधा हव्या असतील तर कर भरण्याची सवय लावून घ्या,’ असा सल्ला महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमात नाशिककरांना देत करवाढीबद्दल आपली भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, उपक्रमात २७ तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांनी काही तक्रारींची दखल घेत निराकरणाचे आश्वासन दिले तर काही तक्रारदारांचे दात त्यांच्याच घशात घालत घाम फोडण्याचेही काम चोखपणे बजावले.  गोल्फ क्लबवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी ६ ते ६.३० या वेळेत तक्रारदार नागरिकांना टोकन क्रमांकाचे वाटप झाल्यानंतर आयुक्तांनी मैदानावर उभारलेल्या छोटेखानी व्यासपीठावरून एकेक तक्रारींचा निपटारा करण्यास सुरुवात केली. मागील शनिवारी (दि.२१) झालेल्या उपक्रमात ७१ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या तर शनिवारी (दि.२८) २७ तक्रारदारांनी आपली गाहाणी आयुक्तांच्या पुढ्यात मांडली. त्यामधील काही तक्रारींसंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकारीवर्गाला दिले तर काही तक्रारदारांना उलट सवाल करत नागरिकांच्या कर्तव्याचेही भान आणून देण्याचा प्रयत्न केला. याचवेळी, करवाढीचा मुद्दाही समोर आला असता आयुक्तांनी त्यावर आपली मते मांडताना सांगितले, नाशिकमध्ये मिळकत कराचे उत्पन्न हे अवघे ८२ कोटी रुपये आहे.सदस्यांच्या प्रॉपर्टी आहेत काय ?डिसूझा कॉलनीतील टेनिस कोर्टजवळ हॉकर्स झोन निश्चित करूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार एका विक्रेत्याने केली. त्यावर, आयुक्तांनी विभागीय अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, विभागीय अधिकाºयांनी त्या प्रभागातील सदस्य व परिसरातील रहिवाशांचा विरोध असल्याचे सांगितले. त्यावेळी, आयुक्तांनी त्याठिकाणी सदस्यांच्या प्रॉपर्टी आहेत काय? असा सवाल करत त्याला महासभेनेच मान्यता दिलेली असल्याने हॉकर्स झोनची त्वरेने अंमलबजावणीचे आदेश दिले.काय म्हणाले आयुक्त ?महापालिकेत मनुष्यबळ अजिबात कमी नाही.  पुढच्या वर्षापासून घरपट्टीची आॅनलाइन बिले मिळणार.  एक एकरपेक्षा मोठ्या उद्यानांच्या ठिकाणी विरंगुळा केंद्र उभारणार.  मनपाच्या मोकळ्या भूखंडांवर यापुढे कोणतेही बांधकाम नाही.  ई-एनएमसी कनेक्ट अ‍ॅपवर आतापर्यंत ४,९०० तक्रारी.संपूर्ण भारतात नाशिकमध्ये सर्वाधिक ग्रीन जीम.  जॉगिंग ट्रॅकवर पेव्हर ब्लॉक बसविणार.  प्लॅस्टिकबंदी अगोदर स्वत:पासूनच करा.  बंद पाणी मीटरबाबत पेनल्टी लावणार. जास्त पाणी वापरानुसार दर आकारणी.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे