नियोजित जम्बो कोविड सेंटरची आयुक्तांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:18 IST2021-08-13T04:18:42+5:302021-08-13T04:18:42+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची झालेली वाताहत लक्षात घेऊन संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून प्रशासनाच्या वतीने उपाययोजना सुरू करण्यात ...

नियोजित जम्बो कोविड सेंटरची आयुक्तांनी केली पाहणी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची झालेली वाताहत लक्षात घेऊन संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून प्रशासनाच्या वतीने उपाययोजना सुरू करण्यात येत आहेत. संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून प्रशस्त रुग्णालय असावे म्हणून जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार महिंद्र अँड महिंद्र, टीडीके इंडिया, लुसी इलेक्ट्रिक, हुपेन, वीर इलेक्ट्रो यासह अन्य कारखान्यांनी सीएसआर निधी उपलब्ध करून दिला आहे. गाद्या, बेड, ऑक्सिजन प्लांट, काॅन्सन्ट्रेटर, टेबल व इतर साहित्याची उभारणी करण्यात येणार आहे. या सीएसआर निधीतून अंबड औद्योगिक वसाहतीत आयमाच्या पुढाकाराने उभारण्यात येत असलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव, अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी आदींसह अधिकाऱ्यांनी भेट दिली व हॉस्पिटलच्या कामाचा आढावा घेतला. या वेळी आयमा विश्वस्त मंडळाचे चेअरमन धनंजय बेळे, आयमाचे उपाध्यक्ष निखिल पांचाळ, सुदर्शन डोंगरे, सचिव राजेंद्र पानसरे, गोविंद झा, राजेंद्र कोठावदे, राजेंद्र अहिरे आदी उपस्थित होते.
फोटो आर फोटो १० कोविड :- अंबड औद्योगिक वसाहतीत सीएसआर निधीतून उभारण्यात येत असलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाच्या कामाची पाहणी करताना मनपा आयुक्त कैलास जाधव. समवेत सुरेश खाडे, नितीन गवळी, धनंजय बेळे, निखिल पांचाळ, सुदर्शन डोंगरे, राजेंद्र पानसरे, गोविंद झा, राजेंद्र कोठावदे, राजेंद्र अहिरे आदी.