शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

नाशकात करवाढीवर आयुक्त तुकाराम मुंढे ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 16:55 IST

वॉक विथ कमिशनर : सुविधा हव्या असतील तर कर भरा

ठळक मुद्दे उपक्रमात २७ तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांनी काही तक्रारींची दखल घेत निराकरणाचे आश्वासन दिले तर काही तक्रारदारांचे दात त्यांच्याच घशात घालत घाम फोडण्याचेही काम चोखपणे बजावले स्टेप बाय स्टेपच करवाढ लागू केल्याची माहितीही आयुक्तांनी यावेळी देत करवाढ अटळ असल्याचे स्पष्ट केले.

नाशिक : ‘पॉप्युलर होणे माझ्यासाठी खूप सोपे आहे, परंतु मी शहराच्या सुखासाठी आलो आहे. कोणत्याही सुविधा मोफत मिळणार नाहीत. सुविधा हव्या असतील तर कर भरण्याची सवय लावून घ्या,’ असा सल्ला महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमात नाशिककरांना देत करवाढीबद्दल आपली भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, उपक्रमात २७ तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांनी काही तक्रारींची दखल घेत निराकरणाचे आश्वासन दिले तर काही तक्रारदारांचे दात त्यांच्याच घशात घालत घाम फोडण्याचेही काम चोखपणे बजावले.गोल्फ क्लबवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी ६ ते ६.३० या वेळेत तक्रारदार नागरिकांना टोकन क्रमांकाचे वाटप झाल्यानंतर आयुक्तांनी मैदानावर उभारलेल्या छोटेखानी व्यासपीठावरून एकेक तक्रारींचा निपटारा करण्यास सुरुवात केली. मागील शनिवारी (दि.२१) झालेल्या उपक्रमात ७१ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या तर शनिवारी (दि.२८) २७ तक्रारदारांनी आपली गा-हाणी आयुक्तांच्या पुढ्यात मांडली. त्यामधील काही तक्रारींसंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकारीवर्गाला दिले तर काही तक्रारदारांना उलट सवाल करत नागरिकांच्या कर्तव्याचेही भान आणून देण्याचा प्रयत्न केला. याचवेळी, करवाढीचा मुद्दाही समोर आला असता आयुक्तांनी त्यावर आपली मते मांडताना सांगितले, नाशिकमध्ये मिळकत कराचे उत्पन्न हे अवघे ८२ कोटी रुपये आहे. तेच उत्पन्न पिंपरी चिंचवडचे ७५० कोटी तर ठाणे मनपाचे ३४० कोटी रुपये इतके आहे. त्यासाठीच कर सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. इमारत आणि जमीन यांच्यावर कायद्यानुसारच विचारपूर्वक करआकारणी करण्यात आलेली आहे. करदराला महासभेने मान्यता दिली आहे तर करयोग्य मूल्य निश्चित करण्याचे अधिकार आयुक्तांना आहे. महापालिकेकडे चारपेक्षा जास्त उत्पन्नाचे स्त्रोत नाहीत. सुविधा पाहिजे असतील तर त्यासाठी कर भरण्याची सवय लावून घेतली पाहिजे. इतक्या वर्षात करवाढ झालेली नाही. आता स्टेप बाय स्टेपच करवाढ लागू केल्याची माहितीही आयुक्तांनी यावेळी देत करवाढ अटळ असल्याचे स्पष्ट केले.तक्रारदारांनाच सुनावलेतिडके कॉलनीतील मातोश्रीनगर येथे उद्यानातील खेळण्यांची दुरुस्तीची मागणी तक्रारदाराने केली असता, खेळण्या कोण तोडतो असा सवाल आयुक्तांनी केला. खेळण्या सांभाळण्याची जबाबदारी परिसरातील नागरिकांची आहे. घरातील व्यायामाचे साहित्य कसे टिकते, असा सवालही त्यांनी केला. गीता अपार्टमेंटमधील पार्किंगची समस्या समोर आली असता, आयुक्तांनी अनधिकृत पार्किंग असेल तर संपूर्ण इमारतीवरच कारवाई करू, असे तक्रारदारास सुनावले. प्रीमिअम दरवाढीचा प्रश्न घेऊन आलेल्या शेतकऱ्यालाही आयुक्तांनी खडसावले. आयुक्तांच्या या पवित्र्यामुळे टोकन क्रमांक जाहीर करूनही काही तक्रारदार समोर आले नाहीत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे