शेतमजुरांच्या कौशल्यआधारित प्रशिक्षणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 11:08 PM2020-07-30T23:08:58+5:302020-07-31T01:32:39+5:30

नाशिक : शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीमधील विविध निविष्ठांसोबत शेतमजुरांची कार्यक्षमता हा घटकदेखील महत्त्वाचा आहे. त्यामुळे राज्यातील शेतमजुरांना कौशल्यआधारित प्रशिक्षणाचा कार्यक्र म हाती घेण्यात आला असून, राज्यातील सुमारे एक लाख शेतमजुरांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Commencement of skill based training of agricultural laborers | शेतमजुरांच्या कौशल्यआधारित प्रशिक्षणास सुरुवात

शेतमजुरांच्या कौशल्यआधारित प्रशिक्षणास सुरुवात

Next
ठळक मुद्देदादा भुसे : एक लाख शेतमजुरांचे उद्दिष्ट

नाशिक : शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीमधील विविध निविष्ठांसोबत शेतमजुरांची कार्यक्षमता हा घटकदेखील महत्त्वाचा आहे. त्यामुळे राज्यातील शेतमजुरांना कौशल्यआधारित प्रशिक्षणाचा कार्यक्र म हाती घेण्यात आला असून, राज्यातील सुमारे एक लाख शेतमजुरांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
शेतमजुरांसाठी असलेल्या या कार्यक्रमाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात झाली असून, प्रशिक्षण घेतलेल्या शेतमजुरांना प्रमाणपत्रदेखील देण्यात येईल व त्याची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाईल, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
सद्यस्थितीमध्ये कापूस व मका पिकांसाठी फवारणीची कामे मोठ्या प्रमाणावर करावी लागणार असल्यामुळे ही प्रमुख पिके असलेल्या क्षेत्रात किटकनाशक फवारणी करणाºया मजुरांना फवारणीचे कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याचा कार्यक्र म प्राधान्याने आयोजित करण्यात आलेला आहे. जेणेकरून किटकनाशकांचा योग्य वापर होईल व मजुरांची सुरक्षितता जपली जाईल, असेही भुसे यांनी सांगितले.
पीकपद्धतीमध्ये औषध फवारणी, फळबागांची छाटणी, बीबीएफद्वारे पेरणी, कापूस वेचणी, सूक्ष्म सिंचनाची देखभाल दुरुस्ती, रोपवाटिकेतील कामे, नियंत्रित शेती, शेतमालाची स्वच्छता व प्रतवारी इत्यादी सर्व कामे ही कौशल्यावर आधारित आहेत. याबाबत शेतमजुरांना कौशल्यआधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता, दर्जा व वेग सुधारण्यास मदत होईल व शेतकऱ्यांनादेखील त्याचा फायदा होईल.
शेतमजुरांचे कौशल्य वाढविणे, ग्रामीण भागात रोजगार निर्मितीस चालना, सुरक्षितता व आरोग्य संरक्षण, कार्यक्षम व्यावसायिक सेवांची शेतकºयांना उपलब्धता, पर्यावरणपूरक कृषी पद्धतीस प्रोत्साहन व गुणवत्तापूर्ण शेतीमालाचे उत्पादन करण्यासाठी शेतमजुरांना कौशल्यआधारित प्रशिक्षण कार्यक्र म राबविण्यात येत आहे.

Web Title: Commencement of skill based training of agricultural laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.