वार्शी येथे कृषी संजीवनी सप्ताहाचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:29 IST2020-07-03T22:27:40+5:302020-07-04T00:29:58+5:30

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त देवळा तालुक्यातील वार्शी येथे कृषी संजीवनी सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमाचे प्रतिनिधिक स्वरूपात तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Commencement of Agriculture Revitalization Week at Warshi | वार्शी येथे कृषी संजीवनी सप्ताहाचा प्रारंभ

वार्शी येथे कृषी संजीवनी सप्ताहाचा प्रारंभाप्रसंगी सचिन देवरे, प्रशांत पवार, हेमराज सोनवणे, महेश देवरे आदी.

खर्डे : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त देवळा तालुक्यातील वार्शी येथे कृषी संजीवनी सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमाचे प्रतिनिधिक स्वरूपात तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. देवळा येथील प्रगतिशील शेतकरी हेमराज सोनवणे यांच्या शेतावर या सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. यावेळी कृषी शास्रज्ञ रामदास पाटील, रूपेश खेडकर, तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे यांनी मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी राजेश देशमुख, मुख्याधिकारी संदीप भोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, सचिन देवरे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत पवार, महेश देवरे आदी उपस्थित होते.

Web Title: Commencement of Agriculture Revitalization Week at Warshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.